sujataparabrecipes

अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,  भात किंवा भाकरी सोबत याची चव अप्रतिम लागते.

अळूची पाने किवा भाजी ही रानभाजी म्हणून ही ओळखली जाते. ह्याचे दोन प्रकार असतात. एक दुधी अळू किवा गोड अळू ज्याला खाज नसते, पाने काळसर हिरवी असतात आणि दूसरा गावठी किवा रानटी अळू ज्याला नैसर्गिकरित्या खाज असते, पाने लाइट हिरव्या रंगाची असतात. हे अळू पावसाळ्यातच मिळते. गावाच्या ठिकाणी किवा जंगलात हे अळू बघायला मिळते.

ह्याची कोवळी पाने काढून त्याच्या विविध रेसिपी बनवल्या जातात. त्यातीलच एक अळूच फतफतं किवा अळूच्या पानांची रस्सा भाजी.

पाऊस पडला की आपसूकची रुजनारी ही भाजी अत्यंत आवडीने गावाकडे खाल्ली जाते. आता तर ही भाजी शहरात ही मिळू लागली आहे. परंतु ही भाजी खूप जणांना आवडत नाही.

जून झालेली पाने ही गडद हिरव्या रंगाची आणि मोठी असतात. ह्याचा वापर सहसा कुठल्याही रेसिपीत करत नाहीत कारण त्या पानाच्या पाककृतीमध्ये खाल्यानंतर घशाला खूप खाज येऊ शकते आणि त्याची चवही फारशी लागत नाही.

ह्या भाजीत चव आणण्यासाठी शेंगदाणे घालतात .किवा काही ठिकाणी चणा डाळ किवा तूर डाळ ही वापरली जाते.  खाज न येण्यासाठी ह्या भाजीत कोकम पाणी किवा चिंचेच्या पाण्याचा वापर करतात. ही एक महत्वाची स्टेप आहे.

आमच्या घरी शेंगदाने वापरुन असाच प्रकारे ही भाजी केली जात असे आणि ती अगदी चवदार लागत असे. 

अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. ही भाजी अनेक शारीरिक समस्यांवर बहुगुणी आहे. ह्यात विटमिन्स, पोटॅशियम, कॅल्शियम हे मुबलक प्रमाणात असतात.

साहित्य

  • अळूची पाने / Arbi leaves (Colocasia Leaves) – अळूची पाने किवा भाजी ही रानभाजी म्हणून ही ओळखली जाते. ह्याचे दोन प्रकार असतात. एक दुधी अळू किवा गोड अळू ज्याला खाज नसते आणि दूसरा गावठी किवा रानटी अळू ज्याला नैसर्गिकरित्या खाज असते. भाजीसाठी पावसाळ्यात मिळणारा हिरव्या आणि छोट्या पानांचा अळूच वापरावा. ह्या भाजीत गोडा अळू वापरला तरी चालतो.
  • ओला नारळ – किसलेले ओले खोबरे हे भाजीला घट्ट बनवण्यासाठी आणि चव आणण्यासाठी वापरले आहे.
  • गूळ – आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी गुळाचा वापर करतात. गूळ नसेल तर साखर वापरावी.
  • चिंच – चिंचेचे पाणी वापरल्यामुळे अळूच्या पानांना असणारी खाज कमी होते. चिंच नसेल तर कोकम पाणी वापरावे. परंतु हे पाककृती मधून वगळू नये.
  • शेंगदाने – शेंगदान्यामुळे ह्या भजीची चव अप्रतिम लागते.
  • लसूण – लसणीला ही उग्र वास आणि चव असते. ती जर शिजवून वापरली तर हा उग्रपणा नाहीसा होऊन तो पदार्थ चवदार होतो. कांद्याप्रमाणे लसणीचा वापर ही अतिशय मोठ्या प्रमाणावर स्यंपाकामध्ये केला जातो

कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज

साठवण

ही भाजी उरली असल्यास हवा बंद डब्यात ठेवून, फ्रीज मध्ये ठेवली तर १ ते २ दिवस चांगली राहते.

महत्वाच्या टिप्स

  • पाने कोवळी असतील तर ती पटकन शिजतात.
  • माती वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ३ वेळा भाजी स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.
  • ह्या भाजीसाठी रानटी अळू वापरतात जो पावसाळ्यातच उपलब्ध असतो. तरीही गोडा अळू वापरला तरी चालतो.
  • भाजीत कापलेल्या ओल्या खोबर्‍याचे पातळ काप ही काही ठिकाणी घालतात.
  • शेंगदाने रात्रभर किवा ३ ते ४ तासानंसाठी पाण्यात फुगण्यासाठी ठेवावेत.
  • चिंचेचे पाणी किवा कोकम वापरले तरी चालते.
  • गूळ नसेल तर साखर वापरावी.

रेसिपी कार्ड

अळूच फतफत (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

Sujata Hande-Parab
“अळूच फतफतं” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,  भात किंवा भाकरी सोबत याची चव अप्रतिम लागते.
अळूची पाने किवा भाजी ही रानभाजी म्हणून ही ओळखली जाते. ह्याचे दोन प्रकार असतात. एक दुधी अळू किवा गोड अळू ज्याला खाज नसते आणि दूसरा गावठी किवा रानटी अळू ज्याला नैसर्गिकरित्या खाज असते. हे अळू पावसाळ्यातच मिळते. गावाच्या ठिकाणी किवा जंगलात हे अळू बघायला मिळते.
Prep Time 20 minutes
Cook Time 15 minutes
4 hours
Total Time 4 hours 35 minutes
Course Side Dish
Cuisine Indian
Servings 6 people

Equipment

  • १ प्रेशर कूकर

Ingredients
  

  • 3 कप अळूच्या पानांची जुडी  – 2 जुडया किवा किवा २ १/२कप (दाबून) +१/२ कप देठ (बारीक कापून घेतलेले)
  • १/४ कप शेंगदाने
  • १/२ टिस्पून राई
  • १/२ टिस्पून जिरे
  • १/४ टिस्पून हळद
  • १/२ टिस्पून लाल मसाला
  • टिस्पून गरम मसाला
  • ५ ते ६ लसूण पाकळ्या कापून
  • २-३ हिरवी मिरची चिरून – मध्ये कापून उभ्या कापाव्यात (तिखट आपल्या आवडीनुसारकमी जास्त करावे).
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • मीठ – चवीनुसार
  • १/४ कप, ३ टेबलस्पून किसलेला नारळ पाणी घालून ब्लेंडर ल लावून वाटण करून घ्यावे.
  • २ १/२ टेबलस्पून चिंचेचे पाणी
  • १, १/२ टिस्पून गूळ
  • २ १/२ – ३ कप साधे पाणी कंसिस्टंसी आपल्याला हवी असेल तशी करा. पातळ हवी असेल तर साधे पाणी घाला.

Instructions
 

  • प्रथम शेंगदाने पाण्यात टाकून २ ते  4 तास ठेवा.
  • अळूची भाजी व्यवसतिथ साफ करून घ्या. साफ करताना पाने आणि देठ  वेगळे करावेत.  भाजी ही कोवळी असावी. कोवळी पाने ही लाइट हिरव्या रंगाची आणि छोटी असतात.
  • पाने आणि देठ वाहत्या पाण्याखाली दोन-तीनदा धुऊन घ्या.  अतिरिक्त पाणी काढून टाका.
  • अळूची पाने एकत्र करून बारीक चिरून घ्या.  
  • देठांचे दोर काढून टाकून ते ही बारीक कापून घ्यावेत.
  • प्रेशरकूकर मध्ये तेल गरम करा. त्यात जिरे-मोहरी किवा राई टाकून ते तडतडू द्या.
  • बारीक कापलेली लसूण घाला. कापलेली मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत भाजून घ्या.
  • हळद, लाल मसाला घालूनपरतून घ्या.
  • कापलेली भाजी आणि देठ टाकून मिक्स करून घ्या.
  • फुगवलेले शेंगदाने टाकून मिक्स करून घ्या.
  • आता गरम मसाला, गूळ आणि मीठ टाकून परत परतून घ्या.
  • खोबरे मिक्सरला लावून बारीक करून घ्या. बारीक करताना १/४ कप पाणी वापरले तरी चालेल.
  • हे वाटण अळूच्या भाजीच्या मिश्रणात घाला
  • ढवळून त्यात २ १/२ – ३ कप पाणी घालून, परत ढवळून कूकर लावून ३ ते ४ शिट्या येवू द्या. गॅसची आच मध्यम-मंद ठेवा.
  • कूकर थंड झाला की, खोलून, गोलाकार चमच्याने अळूची भाजी चांगली घोटून घ्या.म्हणजेच मॅश करून घ्या. मॅशरचा वापर केला तरी चालेल.
  • नंतर त्यात चिंचेचे पाणी टाकून ढवळून घ्या. हे स्कीप करू नये नाहीतर खाताना घशाला खाज येईल.
  • डाळ-भातासोबत, भाकरी किवा चपाती बरोबर  गरमा-गरम सर्व्ह करा

Notes

  • पाने कोवळी असतील तर ती पटकन शिजतात.
  • माती वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ३ वेळा भाजी स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.
  • ह्या भाजीसाठी रानटी अळू वापरतात जो पावसाळ्यातच उपलब्ध असतो. तरीही गोडा अळू वापरला तरी चालतो.
  • भाजीत कापलेल्या ओल्या खोबर्‍याचे पातळ काप ही काही ठिकाणी घालतात.
  • शेंगदाने रात्रभर किवा ३ ते ४ तासानंसाठी पाण्यात फुगण्यासाठी ठेवावेत.
  • चिंचेचे पाणी किवा कोकम वापरले तरी चालते.
  • गूळ नसेल तर साखर वापरावी.
Keyword |Arbi leaves vegetable, Aluchi bhaji, bhaji, indian side dish, indian,, monsoon vegetable, अळू, अळूच फतफत,, अळूची पाने, रानभाजी
वालाचे भिरडे | Lima Beans curry

वालाचे भिरडे | Lima Beans curry

“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…

झटपट पनीर भुर्जी

झटपट पनीर भुर्जी

“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…

वांग्याची सुकी भाजी

वांग्याची सुकी भाजी

“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…

उकडलेल्या अंड्यांची भाजी

उकडलेल्या अंड्यांची भाजी

“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….

मुळ्याची सुक्की भाजी

मुळ्याची सुक्की भाजी

“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,…

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

मधातले फुल मखाने

मधातले फुल मखाने

मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…

फोडणीचा भात (पिवळा)

फोडणीचा भात (पिवळा)

“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…

आले गुळाचा चहा

आले गुळाचा चहा

“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…

झटपट कोबीचे थालीपीठ

झटपट कोबीचे थालीपीठ

कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…

फोडशीच्या पानांची भजी

फोडशीच्या पानांची भजी

फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…

मिश्र भाज्यांचा रायता

मिश्र भाज्यांचा रायता

“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…

गाजर काकडी घावन

गाजर काकडी घावन

“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…

केळ्याची गोड पुरी

केळ्याची गोड पुरी

मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…

गोड आंबा पुरी

गोड आंबा पुरी

मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस  किंवा नुसती चहा बरोबर…

खरबुज जेली

खरबुज जेली

जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…

फणसाचे अप्पे

फणसाचे अप्पे

फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे  हे कडक आणि…

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला  “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…

कसुरी मेथी लच्छा मटरी

कसुरी मेथी लच्छा मटरी

“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडी  (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…

खमंग बीटरूट पुरी

खमंग बीटरूट पुरी

बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…

पालक पुरी

पालक पुरी

पुरी ही एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. पुरी विविध प्रकारे बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये पुरीला प्रथम स्थान आहे. पुरी- भाजी, पुरी-श्रीखंड…

मेथीची भाजी

मेथीची भाजी

मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…

झटपट बेसन बुंदी

झटपट बेसन बुंदी

बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्‍या प्रकारे करता येते….

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

No Thumbnail Found

बाजरीचे इडियप्पम

इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी

“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recipe Rating




error: Content is protected !!