Go Back

अळूच फतफत (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

Sujata Hande-Parab
“अळूच फतफतं” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,  भात किंवा भाकरी सोबत याची चव अप्रतिम लागते.
अळूची पाने किवा भाजी ही रानभाजी म्हणून ही ओळखली जाते. ह्याचे दोन प्रकार असतात. एक दुधी अळू किवा गोड अळू ज्याला खाज नसते आणि दूसरा गावठी किवा रानटी अळू ज्याला नैसर्गिकरित्या खाज असते. हे अळू पावसाळ्यातच मिळते. गावाच्या ठिकाणी किवा जंगलात हे अळू बघायला मिळते.
Prep Time 20 minutes
Cook Time 15 minutes
4 hours
Total Time 4 hours 35 minutes
Course Side Dish
Cuisine Indian
Servings 6 people

Equipment

  • १ प्रेशर कूकर

Ingredients
  

  • 3 कप अळूच्या पानांची जुडी  – 2 जुडया किवा किवा २ १/२कप (दाबून) +१/२ कप देठ (बारीक कापून घेतलेले)
  • १/४ कप शेंगदाने
  • १/२ टिस्पून राई
  • १/२ टिस्पून जिरे
  • १/४ टिस्पून हळद
  • १/२ टिस्पून लाल मसाला
  • टिस्पून गरम मसाला
  • ५ ते ६ लसूण पाकळ्या कापून
  • २-३ हिरवी मिरची चिरून – मध्ये कापून उभ्या कापाव्यात (तिखट आपल्या आवडीनुसारकमी जास्त करावे).
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • मीठ - चवीनुसार
  • १/४ कप, ३ टेबलस्पून किसलेला नारळ पाणी घालून ब्लेंडर ल लावून वाटण करून घ्यावे.
  • २ १/२ टेबलस्पून चिंचेचे पाणी
  • १, १/२ टिस्पून गूळ
  • २ १/२ - ३ कप साधे पाणी कंसिस्टंसी आपल्याला हवी असेल तशी करा. पातळ हवी असेल तर साधे पाणी घाला.

Instructions
 

  • प्रथम शेंगदाने पाण्यात टाकून २ ते  4 तास ठेवा.
  • अळूची भाजी व्यवसतिथ साफ करून घ्या. साफ करताना पाने आणि देठ  वेगळे करावेत.  भाजी ही कोवळी असावी. कोवळी पाने ही लाइट हिरव्या रंगाची आणि छोटी असतात.
  • पाने आणि देठ वाहत्या पाण्याखाली दोन-तीनदा धुऊन घ्या.  अतिरिक्त पाणी काढून टाका.
  • अळूची पाने एकत्र करून बारीक चिरून घ्या.  
  • देठांचे दोर काढून टाकून ते ही बारीक कापून घ्यावेत.
  • प्रेशरकूकर मध्ये तेल गरम करा. त्यात जिरे-मोहरी किवा राई टाकून ते तडतडू द्या.
  • बारीक कापलेली लसूण घाला. कापलेली मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत भाजून घ्या.
  • हळद, लाल मसाला घालूनपरतून घ्या.
  • कापलेली भाजी आणि देठ टाकून मिक्स करून घ्या.
  • फुगवलेले शेंगदाने टाकून मिक्स करून घ्या.
  • आता गरम मसाला, गूळ आणि मीठ टाकून परत परतून घ्या.
  • खोबरे मिक्सरला लावून बारीक करून घ्या. बारीक करताना १/४ कप पाणी वापरले तरी चालेल.
  • हे वाटण अळूच्या भाजीच्या मिश्रणात घाला
  • ढवळून त्यात २ १/२ – ३ कप पाणी घालून, परत ढवळून कूकर लावून ३ ते ४ शिट्या येवू द्या. गॅसची आच मध्यम-मंद ठेवा.
  • कूकर थंड झाला की, खोलून, गोलाकार चमच्याने अळूची भाजी चांगली घोटून घ्या.म्हणजेच मॅश करून घ्या. मॅशरचा वापर केला तरी चालेल.
  • नंतर त्यात चिंचेचे पाणी टाकून ढवळून घ्या. हे स्कीप करू नये नाहीतर खाताना घशाला खाज येईल.
  • डाळ-भातासोबत, भाकरी किवा चपाती बरोबर  गरमा-गरम सर्व्ह करा

Notes

  • पाने कोवळी असतील तर ती पटकन शिजतात.
  • माती वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ३ वेळा भाजी स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.
  • ह्या भाजीसाठी रानटी अळू वापरतात जो पावसाळ्यातच उपलब्ध असतो. तरीही गोडा अळू वापरला तरी चालतो.
  • भाजीत कापलेल्या ओल्या खोबर्‍याचे पातळ काप ही काही ठिकाणी घालतात.
  • शेंगदाने रात्रभर किवा ३ ते ४ तासानंसाठी पाण्यात फुगण्यासाठी ठेवावेत.
  • चिंचेचे पाणी किवा कोकम वापरले तरी चालते.
  • गूळ नसेल तर साखर वापरावी.
Keyword |Arbi leaves vegetable, Aluchi bhaji, bhaji, indian side dish, indian,, monsoon vegetable, अळू, अळूच फतफत,, अळूची पाने, रानभाजी