वरीच्या तांदळाचे पीठ, केळे, आणि गूळ वापरून “गोड फराळी घारगे” केलेले आहेत. चहा बरोबर अतिशय स्वादिष्ट लागतात.
भगर हे मिलेट च्या वर्गात येते. ह्याला समा राइस, सामवत, ह्या नावांनी ही ओळखले जाते. महाराष्ट्रात वारीचे तांदूळ हे उपवासाला खाल्ले जातात. त्याचे विविध पदार्थ जसे की पुरी, भात, शिरा, पराठा असे विविध प्रकार बनवले आणि खाल्ले जातात.
हा तांदूळ भारतात सगळीकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. भगर हे लवकर वाढणारे पीक आहे. ४५ -५० दिवसात ह्याचे पीक तयात होते. भगर भाता मध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते.
सैधव मीठ, शेंदेलोण किवा सैंधा नमक हे उपवासला खाल्ले जाते. बर्याच ठिकाणी साध्या मिठाचा वापर हा उपवासला वर्ज्य असतो असा वेळेला सैधव मीठ हे वापरले जाते. सैधव मीठ हे खांनीमधून मिळते म्हणूनच की कै ह्यास खनिज मीठ असे ही म्हटले जाते. हे मीठ जेवणं व्यतिरिक्त अनेक औषधी गुणधर्मासाठी ही ओळखले जाते. सौन्दर्य प्रसाधांनांमध्येही ह्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. साध्या मीठा पेक्षा हे थोडे महाग असते.
साहित्य

- वरी भात पीठ – वरीचे तांदूळ हे उपवासला चालतात. वरीचे पीठ ही बाजारात उपलब्ध असते. जर नसेल तर वरीचा तांदूळ मिक्सर ल लावून त्याचे पीठ करून त्याचा वापर करता येईल.
- केळे – पिकलेली केळी खाण्यासाठी, विविध प्रकारच्या रेसिपीच बनवण्यासाठी वापरतात. केळी जास्त पिकलेली असतील तर अतिउत्तम. कुठल्याही प्रकारची पिकलेली केळी वापरली तरी चालतील.
- गूळ -गूळ हा असतीशय आरोग्यदायी आणि चवीलाही वेगळा लागतो. आजकाल बाजारात गुळा मध्येही विविध प्रकार मिळू लागले आहेत. कुठलाही गूळ किवा अगदी साखर वापरली तरी चालते.
- सैंधव मीठ -सैंधव मीठ हा मिठाचा एक प्रकार आहे. उपवासला ह्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे मीठ नसेल तर साध्या मिठाचा वापर केला तरी चालतो.
- तेल – कुठल्याही प्रकारचे तेल वापरले तरी चालते. तुपामध्ये ही तळले तरी चांगली लागते.
कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज









साठवण (स्टोरेज)
पुर्या ह्या नेहमी गरम-गरमच चांगल्या लागतात. उरल्या असतील तर त्या बटर पेपर किवा क्लिंग राप्स मध्ये बांधून किवा केळीच्या पानात बांधून ठेवाव्यात. हवा बंद डब्यात ठेवल्यास ही त्या 2-3 दिवस चांगल्या राहतात.
महत्वाच्या टिप्स
- केळे थोडे थोडे घालावे सगळे एकदम घातल्यास पीठ जास्त चिकट होण्याची शक्यता असते.
- जर लागत असेल तर वरीचे पीठ घालून कणिक तिंबून घ्यावी.
- पुरी साठी पीठ घट्ट मळावे.
रेसिपी कार्ड

गोड फराळी घारगे
Equipment
- १ कढई
Ingredients
- १ कप वरी तांदूळ पीठ
- १/२ पिकलेले केळे – सोलून मॅश केलेले (सगळे एकदम घालू नये)
- १/४ टीस्पून मीठ किंवा सैंधव मीठ
- १-२ किसलेला गुळ किंवा साखर – (केळ्याच्या गोडीनुसार कमी जास्त करा)
- १/२ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + २ कप तळण्यासाठी तेल
- पाणी पीठ मळण्यासाठी – गरजेनुसार लागत असेल तरच वापरावे. (पर्यायी)
सर्विंग साठी
- फ्रेश खोबरे चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी , चहा
Instructions
- परातीत किंवा बाउल मध्ये वरी तांदूळ पीठ घ्या.
- त्यात तेल घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
- त्यामध्ये किसलेला गुळ, मीठ, पिकलेले मॅश केलेले केळेघालून मिश्रण एकजीव करून घ्या. लागत असल्यास थोडे थोडे पाणी घालून चांगले (लागत असेल तरच)आणि घट्ट पीठ मळून घ्या. २०-३० मिनिटासाठी झाकून ठेवून द्या.
- नंतर हातानं तेल लावून पीठाचे गोळे बनवून घ्या.
- पोळपाटावर प्लास्टिक पेपर ठेवून घारगे लाटून घ्या. जर पीठ चिकट लागत असेल तर पोळपाटाला आणि गोळ्यांना पीठ लावून घारगे लाटून घ्या. किंवा एक मोठी मध्यम जाड पोळी लाटून ३ इंच कटर ने छोटे छोटे घारगे कापून घ्यावेत
- एका कढई मध्ये मध्यम कमी आचेवर तेल गरम करून त्यात बनवलेले घारगे व्यवस्तीत दोन्ही बाजूने लालसर होई पर्यंत टाळून घ्या. तेल जास्त गरम करू नका.
- ताज्या खोबऱ्याचा चटणी किंवा चहा बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.
Notes
- केळे थोडे थोडे घालावे सगळे एकदम घातल्यास पीठ जास्त चिकट होण्याची शक्यता असते.
- जर लागत असेल तर वरीचे पीठ घालून कणिक तिंबून घ्यावी.
- पुरी साठी पीठ घट्ट मळावे.
वालाचे भिरडे | Lima Beans curry
“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…
अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable
अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices
ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…
टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)
“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…
झटपट पनीर भुर्जी
“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…
वांग्याची सुकी भाजी
“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…
उकडलेल्या अंड्यांची भाजी
“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…
बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)
बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….
मुळ्याची सुक्की भाजी
“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम चपाती,…
समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी
“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
मधातले फुल मखाने
मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…
फोडणीचा भात (पिवळा)
“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…
आले गुळाचा चहा
“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…
झटपट कोबीचे थालीपीठ
कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…
फोडशीच्या पानांची भजी
फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…
झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा
“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…
मिश्र भाज्यांचा रायता
“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…
गाजर काकडी घावन
“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…
केळ्याची गोड पुरी
मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…
खरबुज आंबा रायता
खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….
ओट्स रवा डोसा
ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…
गोड आंबा पुरी
मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस किंवा नुसती चहा बरोबर…
खरबुज जेली
जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…
फणसाचे अप्पे
फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे हे कडक आणि…
केळ्याचे शिकरण
केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…
मस्कमेलॉन(खरबूज) रस
मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…
कसुरी मेथी लच्छा मटरी
“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…
स्रम्बलेड अंडे
स्रम्बलेड अंडी (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…
शिंगाडा पिठाचे थालीपीठ
शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…
खमंग बीटरूट पुरी
बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…
उपवासाची केळ्याची भाजी
उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…
मेथीची भाजी
मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
पौष्टिक गाजर फलाफल
पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…
झटपट बेसन बुंदी
बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्या प्रकारे करता येते….
फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)
फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

बाजरीचे इडियप्पम
इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…
भेंडीची भाजी
“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…
नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry
ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…
दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney
“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…