Go Back

गोड फराळी घारगे

Sujata Hande-Parab
वरीच्या तांदळाचे पीठ, केळे, आणि गूळ वापरून गोड फराळी घारगेकेलेले आहेत. चहा बरोबर अतिशय स्वादिष्ट लागतात.
Prep Time 20 minutes
Cook Time 10 minutes
Total Time 30 minutes
Course Main Course, Snack
Cuisine Fusion, Indian
Servings 4 People

Equipment

  • १ कढई

Ingredients
  

  • कप वरी तांदूळ पीठ
  • १/२ पिकलेले केळे – सोलून मॅश केलेले (सगळे एकदम घालू नये)
  • १/४ टीस्पून मीठ किंवा सैंधव मीठ
  • १-२ किसलेला गुळ किंवा साखर – (केळ्याच्या गोडीनुसार कमी जास्त करा)
  • १/२ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + २ कप तळण्यासाठी तेल
  • पाणी पीठ मळण्यासाठी - गरजेनुसार लागत असेल तरच वापरावे. (पर्यायी)

सर्विंग साठी

  • फ्रेश खोबरे चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी , चहा

Instructions
 

  • परातीत किंवा बाउल मध्ये वरी तांदूळ पीठ घ्या.
  • त्यात तेल घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
  • त्यामध्ये किसलेला गुळ, मीठ, पिकलेले मॅश केलेले केळेघालून मिश्रण एकजीव करून घ्या. लागत असल्यास थोडे थोडे पाणी घालून चांगले (लागत असेल तरच)आणि घट्ट पीठ मळून घ्या. २०-३० मिनिटासाठी झाकून ठेवून द्या.
  • नंतर हातानं तेल लावून पीठाचे गोळे बनवून घ्या.
  • पोळपाटावर प्लास्टिक पेपर ठेवून घारगे लाटून घ्या.  जर पीठ चिकट लागत असेल तर पोळपाटाला आणि गोळ्यांना पीठ लावून घारगे लाटून घ्या.  किंवा एक मोठी मध्यम जाड पोळी लाटून ३ इंच कटर ने छोटे छोटे घारगे कापून घ्यावेत
  • एका कढई मध्ये मध्यम कमी आचेवर तेल गरम करून त्यात बनवलेले घारगे व्यवस्तीत दोन्ही बाजूने लालसर होई पर्यंत टाळून घ्या. तेल जास्त गरम करू नका.
  • ताज्या खोबऱ्याचा चटणी किंवा चहा बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

Notes

  • केळे थोडे थोडे घालावे सगळे एकदम घातल्यास पीठ जास्त चिकट होण्याची शक्यता असते.
  • जर लागत असेल तर वरीचे पीठ घालून कणिक तिंबून घ्यावी.
  • पुरी साठी पीठ घट्ट मळावे.
Keyword banana, farali, fried puri, quick, उपवास, केळे, घारगे, पुरी