“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट आणि सकाळचा नास्ता असो, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण; घावन हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. टिफिन साठी हि अगदी हेलथी, पटकन होणारा आणि अनेक प्रकारे बनवता येणारा असा पदार्थ आहे.
“घावन” हि एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश आहे. ती महाराष्ट्र आणि गोव्यात मोठ्या आवडीने खाल्ली जाते. दक्षिणे कडे हि डिश “नीर डोसा” ह्या नावाने प्रचलित आहे त्यात फक्त किसलेले ओले खोबरे घालून ते बनवले जाते.
कोकणात तांदूळ किंवा तांदळाची कणी धुवून ती सुखवून थोडे जाडसर पीठ दळून आणून ठेवून दिले जाते आणि जेव्हा घावन बनवायचे असेल तेव्हा पटकन हे पीठ वापरले जाते.
ह्या रेसिपीत मी तांदूळ आणि मेथी दाणे रात्रभर पाण्यात उंबळायला ठेवून सकाळी ते वाटून घेतले आहेत. मेथी दाण्यामुळे घावनची चव अप्रतिम लागते आणि गाजर व काकडी टाकल्यामुळे ते अतिशय हेलथी आणि चवदार होतात.
तांदूळ वापरताना तो जुना असावा किवा स्पेशल इडली-डोसा च तांदूळ जो बाजारात उपलब्ध असतो तो वापरला तरी चालेल.
घावन बनवण्यसाठी एक वेगळा तवा वापरला जातो. त्या तव्याला कोकणांत “भिडे” किवा “भिडयचा तवा” असे म्हटले जाते. भिड्याच्या तव्यावर केलेले घावणे एक अथेंटिक चव देतात. पण आजकाल नॉनस्टिक पॅन सगळ्या ठिकाणी प्रचलित असल्यामुळे ते वापरले तरी चालते.
घावन आणि चटणी हे खाण्यास आणि शरीलाला अतिशय हलके असा पदार्थ आहेत.
साहित्य
- तांदूळ – तांदूळ वापरताना तो जुना असावा किवा स्पेशल इडली-डोसा च तांदूळ जो बाजारात उपलब्ध असतो तो वापरला तरी चालेल.
- गाजर – गाजर बाजारात मुबलक उपलब्ध असतात. लाल किवा ऑरेंज रंग असलेले गाजर भारतात मिळतात. कुठल्याही प्रकारचे गाजर वापरले तरी चालतात. गाजर हे अतिशय पोषक आणि आरोग्यदायी असतात. डोळ्यांसाठी फारच बहुगुणी असतात.
- काकडी – काकडी किवा कुकुम्बर ची चव अगदी फ्रेश, ताजी असते. काकडी मुळे डिश ल एक अप्रतिम चव येते. आणि घावणे नरम लुसलुसित होतात.
- मेथी दाणे – मेथी दाण्यामुळे घावनची चव मस्त लागते. हे पर्यायी आहे.
कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज






साठवण (स्टोरेज)
घावणे जर उरले असतील किवा स्टोर करायचे असतील तर ते झाल्यावर त्याला थंड होऊ द्यावेत. नंतर ते मधोमध घडी करून त्याचे दोन फोल्ड करावेत आणि तो ॲल्युमिनियम फोईल (aluminum foil) किवा क्लिंग रॅप(प्लॅस्टिक रॅप) किवा केळ्याच्या पानात घालून सील करून ठेवावेत. किवा हवा बंद डब्यात घालून ठेवावेत. जेव्हा पाहिजे असेल तेव्हा गरम करून सर्व करावेत. एक ते दोन दिवस फ्रीज मध्ये चांगले राहतात.
महत्वाच्या टिप्स
- दुसर्या बाजूने भाजून घेणे हे पर्यायी आहे. नाही भाजले तरी चालते.
- पिठाची कन्सिस्टन्सी रवा डोसा करताना असते तशी असावी.
- मिश्रण जास्त घट्ट किवा पातळ नसावे.
- भिड्याचा तवा नसेल तर नॉनस्टिक पॅनचाच वापर करावा.
- तांदूळ हा जुना असावा नाहीतर घावणे तव्याला चिकटतील.
रेसिपी कार्ड

गाजर काकडी घावन
Equipment
- १ भिडे किवा नॉनस्टिक पॅन
Ingredients
- २ कप इडली किंवा डोसा तांदूळ
- १ टेबलस्पून मेथीचे दाणे
- ३/४ कप किसलेला गाजर
- १/४ कप किसलेली काकडी
- चवीनुसार मीठ
- 2-3 कप पाणी रात्रभर भिजवण्यासाठी
- १ – ३/४ कप पाणी – मिश्रणासाठी
- 3-4 टेबलस्पून तेल
- सर्विंग – नारळाची चटणी, टोमॅटो चटनी, चहा, कॉफी.
Instructions
- तांदूळ आणि मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी पाणी काढून टाका आणि मिक्सर ला बारीक वाटून घ्या. वाटताना ३/४ भाग किसलेला गाजर व काकडीचे मिश्रण घाला.
- मीठ, राहिलेला १/४ भाग किसलेला गाजर व काकडी आणि पाणी घालून चांगले ढवळून घ्या. मिश्रण फार जाड किंवा अतिशय पातळ असू नये.
- नॉनस्टीक पॅन वर तेल पसरवून घ्यावे. एका गोल चमच्याने बनवलेले तांदूळ गाजराचे मिश्रण व्यवस्तिथ गोलाकार रितीने पॅनवर पसरवून घ्या.
- ४-५ सेकंद पॅनवर ताट ठेवावे.. प्लेट काढून घ्या आणि घावन पॅनच्या कडा सोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. दुसर्या बाजूने भाजून घेणे हे पर्यायी आहे. नाही भाजले तरी चालते.
- नारळ चटणी किंवा मसालेदार टोमॅटो चटणीबरोबर किंवा चहा, कॉफी बरोबर सर्व्ह करा.
Notes
- दुसर्या बाजूने भाजून घेणे हे पर्यायी आहे. नाही भाजले तरी चालते.
- पिठाची कन्सिस्टन्सी रवा डोसा करताना असते तशी असावी.
- मिश्रण जास्त घट्ट किवा पातळ नसावे.
- भिड्याचा तवा नसेल तर नॉनस्टिक पॅनचाच वापर करावा.
- तांदूळ हा जुना असावा नाहीतर घावणे तव्याला चिकटतील.
वालाचे भिरडे | Lima Beans curry
“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…
अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable
अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices
ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…
टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)
“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…
झटपट पनीर भुर्जी
“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…
वांग्याची सुकी भाजी
“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…
उकडलेल्या अंड्यांची भाजी
“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…
बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)
बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….
मुळ्याची सुक्की भाजी
“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम चपाती,…
समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी
“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
मधातले फुल मखाने
मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…
फोडणीचा भात (पिवळा)
“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…
आले गुळाचा चहा
“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…
झटपट कोबीचे थालीपीठ
कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…
फोडशीच्या पानांची भजी
फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…
झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा
“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…
मिश्र भाज्यांचा रायता
“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…
गाजर काकडी घावन
“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…
केळ्याची गोड पुरी
मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…
खरबुज आंबा रायता
खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….
ओट्स रवा डोसा
ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…
गोड आंबा पुरी
मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस किंवा नुसती चहा बरोबर…
खरबुज जेली
जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…
फणसाचे अप्पे
फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे हे कडक आणि…
केळ्याचे शिकरण
केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…
मस्कमेलॉन(खरबूज) रस
मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…
कसुरी मेथी लच्छा मटरी
“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…
स्रम्बलेड अंडे
स्रम्बलेड अंडी (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…
शिंगाडा पिठाचे थालीपीठ
शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…
खमंग बीटरूट पुरी
बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…
उपवासाची केळ्याची भाजी
उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…
मेथीची भाजी
मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
पौष्टिक गाजर फलाफल
पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…
झटपट बेसन बुंदी
बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्या प्रकारे करता येते….
फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)
फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

बाजरीचे इडियप्पम
इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…
भेंडीची भाजी
“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…
नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry
ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…
दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney
“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…