Go Back

गाजर काकडी घावन

Sujata Hande-Parab
“गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा वापर केलेलाआहे. अतिशय स्वादिष्ट आणि सकाळचा नास्ता असो, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण; घावन हाएक अतिशय उत्तम पर्याय आहे. टिफिन साठी हि अगदी हेलथी, पटकन होणारा आणि अनेक प्रकारेबनवता येणारा असा पदार्थ आहे.
“घावन” हि एक लोकप्रिय महाराष्ट्रीयनडिश आहे. ती महाराष्ट्र आणि गोव्यात मोठ्या आवडीने खाल्ली जाते. दक्षिणे कडे हि डिश“नीर डोसा” ह्या नावाने प्रचलित आहेत्यात फक्त किसलेले ओले खोबरे घालून ते बनवले जाते.
Prep Time 8 hours 15 minutes
Total Time 8 hours 15 minutes
Course Breakfast, Main Course
Cuisine Fusion, Indian
Servings 4 people

Equipment

  • १ भिडे किवा नॉनस्टिक पॅन

Ingredients
  

  • कप इडली किंवा डोसा तांदूळ
  • टेबलस्पून मेथीचे दाणे
  • ३/४ कप किसलेला गाजर
  • १/४ कप किसलेली काकडी
  • चवीनुसार मीठ
  • 2-3 कप पाणी रात्रभर भिजवण्यासाठी
  • १ - ३/४ कप पाणी - मिश्रणासाठी 
  • 3-4 टेबलस्पून तेल
  • सर्विंग - नारळाची चटणी, टोमॅटो चटनी, चहा, कॉफी.

Instructions
 

  • तांदूळ आणि मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी  पाणी काढून टाका आणि मिक्सर ला बारीक वाटून घ्या.  वाटताना ३/४ भाग किसलेला गाजर व काकडीचे मिश्रण घाला.
  • मीठ, राहिलेला १/४ भाग किसलेला गाजर व काकडी आणि पाणी घालून चांगले ढवळून घ्या. मिश्रण फार जाड किंवा अतिशय पातळ असू नये.
  • नॉनस्टीक पॅन वर तेल पसरवून घ्यावे. एका गोल चमच्याने  बनवलेले तांदूळ गाजराचे मिश्रण व्यवस्तिथ गोलाकार रितीने पॅनवर पसरवून घ्या.
  • ४-५ सेकंद पॅनवर ताट ठेवावे.. प्लेट काढून घ्या आणि घावन पॅनच्या  कडा सोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. दुसर्‍या बाजूने भाजून घेणे हे पर्यायी आहे. नाही भाजले तरी चालते.
  • नारळ चटणी किंवा मसालेदार टोमॅटो चटणीबरोबर किंवा चहा, कॉफी बरोबर सर्व्ह करा.

Notes

  • दुसर्‍या बाजूने भाजून घेणे हे पर्यायी आहे. नाही भाजले तरी चालते.
  • पिठाची कन्सिस्टन्सी रवा डोसा करताना असते तशी असावी. 
  • मिश्रण जास्त घट्ट किवा पातळ नसावे. 
  • भिड्याचा तवा नसेल तर नॉनस्टिक पॅनचाच वापर करावा. 
  • तांदूळ हा जुना असावा नाहीतर घावणे तव्याला चिकटतील. 
Keyword Carrot, Ghavan, pole, Rice, traditional, गाजर, घावन, तांदूळ पीठ