sujataparabrecipes

शिमला मिरचीची भाजी (Green Capsicum)

शिमला मिरचीची जगभरात लागवड आणि वापर केला जातो. शिमला मिरचीची भाजी केली जाते आणि ही सॅलड मधून कच्ची देखील खाल्ली जाते.

सिमला मिरचीला एक विशीष्ट चव ज्यामुळे ती कुठल्याही डिश मध्ये घातली किवा भाजी, करी मध्ये घातली तर डिशची चव वाढते. बिर्याणी, पुलाव, पिझ्झा, किवा कुठल्याही प्रकारचा पदार्थ बांवण्यासाठी ह्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

सिमला मिरची ही वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. हिरवी, रेड, पिवळी सिमला मिरची ही सर्वश्रूत आहे आणि सगळ्या ठिकाणी मिळते.

महाराष्ट्रात याला “ढोबळी मिरची” म्हणून ही संबोधले जाते आणि याचा वापर रोजच्या स्वयंपाकात नियमितपणे केला जातो. शिमला मिर्च सबजी, भरवा मिर्च, आलू-शिमला, पकोडा, पुलाव, पराठे असे बरेच पदार्थ ही  भाजी वापरून केले जातात. ही आमची पारंपारिक रेसिपी आहे जी आम्ही घरी नियमितपणे तयार करतो. कधीकधी आम्ही ह्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालतो.

साहित्य

  • सिमला मिरची – सिमला मिरची चे अनेक प्रकार आहेत. हिरवी सिमला मिरची ही भाजी करून प्रामुख्याने खाल्ली जाते. चवीला थोडीसी गोडसर, तुरट अशी असते. जास्त मोठी आणि जून शिमला मिरची शिजवल्यावर कडवट ही लागू शकते.
  • कांदा – कांदे हा मुख्य अन्नघटक आहे. तो सर्रासपने सगळ्याच रेसिपीज मध्ये वापरला जातो. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते. तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते.
  • लसूण – लसणीला ही उग्र वास आणि चव असते. ती जर शिजवून वापरली तर हा उग्रपणा नाहीसा होऊन तो पदार्थ चवदार होतो. कांद्याप्रमाणे लसणीचा वापर ही अतिशय मोठ्या प्रमाणावर स्यंपाकामध्ये केला जातो.
  • हिरवी मिरची – हिरवी मिरची जेवणात तिखटपणा आणण्यासाठी केला जातो. चवीनुसार तिखट, कमी तिखट मिरच्यांचा वापर जेवणात केला जातो. मिरच्यांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
  • टोमॅटो टोमॅटो किवा टमाटर हे महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात मिळतात. मुख्यतः दोन प्रकार असतात. गावठी आणि जे आपल्याला बाजारात कायम मिळतात असे हायब्रिड. आणखीन एक म्हणजे चेरी टोमॅटो जे इटालियन रेसिपीज मध्ये किवा सॅलड बनवण्यासाठी वापरले जातात. गावठी टोमॅटो चेंडू सारखे गोल असून त्यांची चव खूपच छान असते. लाल-लाल टोमॅटो पाहायला सुन्दर आणि खाण्यात स्वादिष्ट तसेच पौष्टिक पण असतात.
  • कोथिंबीर – अतिशय फ्लेवर फूल आणि कुठल्याही अन्न पदार्थाची चव वाढवणारी अशी ही कोथिंबीर रोजच्या आहारात वापरली जाते. मग ती चटणी असो किवा भाजी, करी. डिश ला चव आणि ताजेपणा देण्यासाठी कोथिंबीरिच्या पानांचा वापर केला जातो.
  • ताजा किसलेला नारळ – ताजा किसलेला नारळ कुठल्याही पदार्थाची चव वाढवतो. नारळ हा शक्यतो ताजच असावा.

कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज

साठवण (स्टोरेज)

ही भाजी ताजी बनवून खाल्ली जाते. जर उरली असेल तर हवा बंद डब्यात घालून फ्रीज मध्ये ठेवावी आणि दुसर्‍या दिवसी संपवून टाकावी.

महत्वाच्या टिप्स

  • भाजी शिजवताना मध्ये मध्ये चेक करत रहा. नाहीतर भाजी करपन्याची शक्यता असते.
  • भाजीला शिजवताना पाणी लागत नाही पराण भाजी शिजताना त्याला त्याचेच पाणी सुटते आणि भाजी शिजते.
  • ही भाजी वाफेवर शिजवली तर अधिक चांगली लागते.
  • सिमला मिरची ही गावठी किवा कोवळी, लहान असेल तर भाजी अप्रतिम लागते.
  • ओल्या खोबर्‍या ऐवजी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालतो.

रेसिपी कार्ड

शिमला मिरचीची भाजी (Green Capsicum)

Sujata Hande-Parab
महाराष्ट्रात याला “ढोबळी मिरची” म्हणून ही संबोधले जाते आणि याचा वापर रोजच्या स्वयंपाकात नियमितपणे केला जातो. शिमला मिर्च सबजी, भरवा मिर्च, आलू-शिमला, पकोडा, पुलाव, पराठे असे बरेच पदार्थ ही  भाजी वापरून केले जातात. ही आमचीपारंपारिक रेसिपी आहे जी आम्ही घरी नियमितपणे तयार करतो. कधीकधी आम्ही ह्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालतो.
Prep Time 15 minutes
Cook Time 15 minutes
Total Time 30 minutes
Course Main Course, Side Dish
Cuisine Indian
Servings 4 people

Ingredients
  

  • २५० ग्रॅम शिमला मिर्च / हिरवी शिमला मिरची बारीक चिरलेली
  • १/२ टीस्पून मोहरी
  • १/२ टीस्पून जिरे
  • ५-६ पाने कढीपत्ता
  • मध्यम कांदा बारीक चिरलेला
  • ३-४ लसूण ठेचून घेतलेली
  • हिरवी मिरची चिरून – मध्यम तिखट
  • १ मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  • १/२ टीस्पून हळद
  • टीस्पून गरम मसाला
  • १/२ टीस्पून धनिया पावडर
  • १/२-१ टीस्पून लाल मिरची पावडर
  • टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • १-२ टेबलस्पून कोमट पाणी
  • टेबलस्पून ताजा किसलेला नारळ

Instructions
 

  • हिरवी सिमला मिरची किंवा शिमला मिर्च धुऊन, सुक्या कपड्याने पुसून घ्या.  बारीक चिरून घ्या.
  • नॉन-स्टिक पॅनमध्ये किवा टोपात तेल गरम करा. जिरे, मोहरी घाला. ते तडतडू द्या.
  • कढीपत्ता घाला. ढवळा.
  • ठेचलेला लसूण, चिरलेली हिरवी मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत परतून घ्या.
  • आता बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घाला. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • गरम मसाला, धने पावडर, तिखट, हळद घाला. मिसळा
  • बारीक चिरलेला टोमॅटो घाला. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.  टोमॅटो मशी किवा नरम होईपर्यंत शिजवा.
  • चिरलेली हिरवी सिमला मिरची घाला. मसाल्यामध्ये चांगले एकत्र करून घ्या.
  • पॅनवर किवा टोपावर खोलगट प्लेट ठेवा.  त्यावर थोडे १/४ कप पाणी घाला. आणि भाजी वाफेवर शिजू द्या.
  • मध्ये-मध्ये भाजी तपासत रहा.जर भाजी टोपला लागतअसेक किवा एकदम सुखी वाटत असेल तर १ -२ टेबलस्पून कोमट पाणी घाला आणि मिक्स करा. पाणीअसलेली प्लेट परत टोपावर ठेवा.
  • ८-१० मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  • शिमला मिर्च शिजल्यावर मऊ होईल. जास्त शिजवू नका.
  • किसलेले खोबरे घाला. मिसळा. आणखी १ मिनिट शिजवा.
  • चपाती, डाळ भात, रोटी, नान बरोबर गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • भाजी शिजवताना मध्ये मध्ये चेक करत रहा. नाहीतर भाजी करपन्याची शक्यता असते.
  • भाजीला शिजवताना पाणी लागत नाही पराण भाजी शिजताना त्याला त्याचेच पाणी सुटते आणि भाजी शिजते.
  • ही भाजी वाफेवर शिजवली तर अधिक चांगली लागते.
  • सिमला मिरची ही गावठी किवा कोवळी, लहान असेल तर भाजी अप्रतिम लागते.
  • ओल्या खोबर्‍या ऐवजी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालतो.
Keyword capsicum, healthy, quick, side dish, इंडियन, भाजी
वालाचे भिरडे | Lima Beans curry

वालाचे भिरडे | Lima Beans curry

“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…

झटपट पनीर भुर्जी

झटपट पनीर भुर्जी

“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…

वांग्याची सुकी भाजी

वांग्याची सुकी भाजी

“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…

उकडलेल्या अंड्यांची भाजी

उकडलेल्या अंड्यांची भाजी

“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….

मुळ्याची सुक्की भाजी

मुळ्याची सुक्की भाजी

“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,…

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

मधातले फुल मखाने

मधातले फुल मखाने

मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…

फोडणीचा भात (पिवळा)

फोडणीचा भात (पिवळा)

“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…

आले गुळाचा चहा

आले गुळाचा चहा

“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…

झटपट कोबीचे थालीपीठ

झटपट कोबीचे थालीपीठ

कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…

फोडशीच्या पानांची भजी

फोडशीच्या पानांची भजी

फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…

मिश्र भाज्यांचा रायता

मिश्र भाज्यांचा रायता

“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…

गाजर काकडी घावन

गाजर काकडी घावन

“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…

केळ्याची गोड पुरी

केळ्याची गोड पुरी

मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…

गोड आंबा पुरी

गोड आंबा पुरी

मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस  किंवा नुसती चहा बरोबर…

खरबुज जेली

खरबुज जेली

जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…

फणसाचे अप्पे

फणसाचे अप्पे

फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे  हे कडक आणि…

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला  “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…

कसुरी मेथी लच्छा मटरी

कसुरी मेथी लच्छा मटरी

“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडी  (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…

खमंग बीटरूट पुरी

खमंग बीटरूट पुरी

बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…

पालक पुरी

पालक पुरी

पुरी ही एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. पुरी विविध प्रकारे बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये पुरीला प्रथम स्थान आहे. पुरी- भाजी, पुरी-श्रीखंड…

मेथीची भाजी

मेथीची भाजी

मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…

झटपट बेसन बुंदी

झटपट बेसन बुंदी

बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्‍या प्रकारे करता येते….

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

No Thumbnail Found

बाजरीचे इडियप्पम

इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी

“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recipe Rating




error: Content is protected !!