Go Back

शिमला मिरचीची भाजी (Green Capsicum)

Sujata Hande-Parab
महाराष्ट्रात याला “ढोबळी मिरची” म्हणून ही संबोधले जाते आणि याचा वापर रोजच्या स्वयंपाकात नियमितपणे केला जातो. शिमला मिर्च सबजी, भरवा मिर्च, आलू-शिमला, पकोडा, पुलाव, पराठे असे बरेच पदार्थ ही  भाजी वापरून केले जातात. ही आमचीपारंपारिक रेसिपी आहे जी आम्ही घरी नियमितपणे तयार करतो. कधीकधी आम्ही ह्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालतो.
Prep Time 15 minutes
Cook Time 15 minutes
Total Time 30 minutes
Course Main Course, Side Dish
Cuisine Indian
Servings 4 people

Ingredients
  

  • २५० ग्रॅम शिमला मिर्च / हिरवी शिमला मिरची बारीक चिरलेली
  • १/२ टीस्पून मोहरी
  • १/२ टीस्पून जिरे
  • ५-६ पाने कढीपत्ता
  • मध्यम कांदा बारीक चिरलेला
  • ३-४ लसूण ठेचून घेतलेली
  • हिरवी मिरची चिरून – मध्यम तिखट
  • १ मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  • १/२ टीस्पून हळद
  • टीस्पून गरम मसाला
  • १/२ टीस्पून धनिया पावडर
  • १/२-१ टीस्पून लाल मिरची पावडर
  • टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • १-२ टेबलस्पून कोमट पाणी
  • टेबलस्पून ताजा किसलेला नारळ

Instructions
 

  • हिरवी सिमला मिरची किंवा शिमला मिर्च धुऊन, सुक्या कपड्याने पुसून घ्या.  बारीक चिरून घ्या.
  • नॉन-स्टिक पॅनमध्ये किवा टोपात तेल गरम करा. जिरे, मोहरी घाला. ते तडतडू द्या.
  • कढीपत्ता घाला. ढवळा.
  • ठेचलेला लसूण, चिरलेली हिरवी मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत परतून घ्या.
  • आता बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घाला. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • गरम मसाला, धने पावडर, तिखट, हळद घाला. मिसळा
  • बारीक चिरलेला टोमॅटो घाला. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.  टोमॅटो मशी किवा नरम होईपर्यंत शिजवा.
  • चिरलेली हिरवी सिमला मिरची घाला. मसाल्यामध्ये चांगले एकत्र करून घ्या.
  • पॅनवर किवा टोपावर खोलगट प्लेट ठेवा.  त्यावर थोडे १/४ कप पाणी घाला. आणि भाजी वाफेवर शिजू द्या.
  • मध्ये-मध्ये भाजी तपासत रहा.जर भाजी टोपला लागतअसेक किवा एकदम सुखी वाटत असेल तर १ -२ टेबलस्पून कोमट पाणी घाला आणि मिक्स करा. पाणीअसलेली प्लेट परत टोपावर ठेवा.
  • ८-१० मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  • शिमला मिर्च शिजल्यावर मऊ होईल. जास्त शिजवू नका.
  • किसलेले खोबरे घाला. मिसळा. आणखी १ मिनिट शिजवा.
  • चपाती, डाळ भात, रोटी, नान बरोबर गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • भाजी शिजवताना मध्ये मध्ये चेक करत रहा. नाहीतर भाजी करपन्याची शक्यता असते.
  • भाजीला शिजवताना पाणी लागत नाही पराण भाजी शिजताना त्याला त्याचेच पाणी सुटते आणि भाजी शिजते.
  • ही भाजी वाफेवर शिजवली तर अधिक चांगली लागते.
  • सिमला मिरची ही गावठी किवा कोवळी, लहान असेल तर भाजी अप्रतिम लागते.
  • ओल्या खोबर्‍या ऐवजी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालतो.
Keyword capsicum, healthy, quick, side dish, इंडियन, भाजी