“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा भाजी अतिशय चवदार लागते. लहान मोड किवा अंकुर आलेले वाल वापरले तर ह्या भजीची चव आणखीन वाढते. शिजण्यास ही खूप कमी वेळ लागतो.
वाल किवा ज्याला पावटे किवा इंग्लिश मध्ये Lima Beans असेही म्हटले जाते ह्याचे बरेच प्रकार बाजारात पाहायला मिळतात. गावठी वाल, कडवे वाल, सफेद वाल, साधे रोजचे वाल(बाजारात सहज मिळतात). वाल हे रात्रभर पाण्यात ठेवून त्याला फुगवून नंतर पाणी काढून टाकून, कपड्यात बांधून किवा चाळणीत ठेवून मोड काढून घेतले जातात. नंतर ते सोलून घेऊन त्याचा भाजी मध्ये वापर केला जातो. वाल सोलणे हे फार किचकट आणि टाइम घेणारे काम आहे. आजकाल बाजारात सोललेले आणि मोड आलेले वाल सहज उपलब्ध असतात.
आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीची ही भाजी. सोलायला वेळ लागतो ह्या कारणाने कधीतरी केली जाते. लहानपणी वाल सोलताना खूप मजा येत असे. वाल सोलणे म्हणजे आम्हा भावंडांना एक पर्वणीच वाटत असे. त्यातही वाल सोलण्यासाठी एक वेगळीच स्पर्धा लागत असे. जास्त वाल सोलनार्याला काही बक्षीश नसले तरी तो जिंकण्याचा आनंद काही वेगळाच असे. वालापेक्षा, वालाच्या सोललेल्या जास्त साली पाहून आनंद अगदी द्विगुणीत होत असे.
वाल हे पचायला जड असतात त्यामुळे ही भाजी कमीच खाल्ली जाते आणि शिजवताना हिंगाचा वापर केलाच पाहिजे.
साहित्य



- वाल – वाल किवा ज्याला पावटे किवा इंग्लिश मध्ये Lima Beans असेही म्हटले जाते ह्याचे बरेच प्रकार बाजारात पाहायला मिळतात. गावठी वाल, कडवे वाल, सफेद वाल, साधे रोजचे वाल(बाजारात सहज मिळतात). वाल हे रात्रभर पाण्यात ठेवून त्याला फुगवून नंतर पाणी काढून टाकून, कपड्यात बांधून किवा चाळणीत ठेवून मोड काढून घेतले जातात.


- चिंचेची पेस्ट – नसेल तर कोकम पाणी किवा तुकडे वापरावेत.
- टोमॅटो – – टोमॅटो किवा टमाटर हे महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात मिळतात. मुख्यतः दोन प्रकार असतात. गावठी आणि जे आपल्याला बाजारात कायम मिळतात असे हायब्रिड. आणखीन एक म्हणजे चेरी टोमॅटो जे इटालियन रेसिपीज मध्ये किवा सॅलड बनवण्यासाठी वापरले जातात. गावठी टोमॅटो चेंडू सारखे गोल असून त्यांची चव खूपच छान असते. लाल-लाल टोमॅटो पाहायला सुन्दर आणि खाण्यात स्वादिष्ट तसेच पौष्टिक पण असतात.
- हिंग – पावटे पचायला जड असतात त्यामुळे हिंग ही वापरलीच पाहिजे.
- कांदा – कांदे हा मुख्य अन्नघटक आहे. तो सर्रासपने सगळ्याच रेसिपीज मध्ये वापरला जातो. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते. तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. मी ईथे लाल कांदा वापरला आहे.
- लसूण – लसणीला ही उग्र वास आणि चव असते. ती जर शिजवून वापरली तर हा उग्रपणा नाहीसा होऊन तो पदार्थ चवदार होतो. कांद्याप्रमाणे लसणीचा वापर ही अतिशय मोठ्या प्रमाणावर स्यंपाकामध्ये केला जातो.
- आले – फ्लेवर आणण्यासाठी आले किवा अद्रकचा वापर केला आहे.
- कोथिंबीर – अतिशय फ्लेवर फूल आणि कुठल्याही अन्न पदार्थाची चव वाढवणारी अशी ही कोथिंबीर रोजच्या आहारात वापरली जाते. मग ती चटणी असो किवा भाजी, करी. डिश ला चव आणि ताजेपणा देण्यासाठी कोथिंबीरिच्या पानांचा वापर केला जातो.
- ओले खोबरे – ओले खोबरे घातल्याने भजीची चव वाढते आणि ती घट्ट हिण्यास मदत होते. सुके खोबरे भाजून वाटून घातले तरी चालते.
कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज













साठवण
ही भाजी उरली असल्यास हवा बंद डब्यात ठेवून, फ्रीज मध्ये ठेवली तर २ ते ३ दिवस चांगली राहते. सर्व करताना गरम करून घ्यावी.
महत्वाच्या टिप्स
- वाल जास्त शिजवू नयेत. हाताच्या बोटांनी ते तोडून पहावेत. जर ते तुटत असतील आणि नरम झाले असतील तर ते शिजले समजावे.
- वाल कूकरला कधीही शिजवू नयेत.
- वालाची भाजी मोड न करता ही होते. त्यासाठी रात्रभर वाल भिजायला ठेवून सकाळी पाणी काढून टाकून त्याची साले काढवीत. साले काढताना थोडे पाणी ठेवावे.
- हिंगाचा वापर आवर्जून करावा.
रेसिपी कार्ड

वालाचे भिरडे | Lima Beans curry
Equipment
- १ कढई/नॉनस्टिक पॅन/मध्यम पातेले किवा टोप
Ingredients
- १ १/4 कप पावटा किंवा वाल (लीमा बीन्स) – (रात्रभर भिजवलेले, मोड काढून घेतलेले(अंकुरलेले)
- चवीनुसार मीठ
- १ ते २ कप कोमट पाणी
- १/२ टीस्पून चिंचेची पेस्ट – किंवा कोकमचे तुकडे – २
- साखर एक लहान चिमूटभर
फोडणीसाठी
- १/२ टीस्पून जिरे
- १/२ टीस्पून मोहरी
- १ मध्यम कांदा बारीक चिरलेला
- १/२ टीस्पून हिंग
- १/२ टीस्पून हल्दी पावडर
- १ टीस्पून लाल मिरची पावडर
- १ टीस्पून गरम मसाला किंवागोडा मसाला
- १/२ टीस्पून धने पावडर
- १/२ टीस्पून जिरे पावडर
- १ मध्यम टोमॅटो बारीक चिरलेला
- १ टेबलस्पून तेल
पेस्टसाठी –
- ३ ते ४ टेबलस्पून ताजे किसलेला नारळ
- १/४ कप कोथिंबीर पाने
- १ टीस्पून आल्याचे तुकडे
- ३ नग लसूण पाकळ्या – सोलून घेतलेल्या
Instructions
- लीमा बीन्स किंवा वाल किंवा पावटा रात्रभरपाण्यात भिजवून ठेवा किवा बाजारात सहज उपलब्ध असलेले अंकुरलेले आणि सोललेले वालवापरा.
- भिजवलेले वालओल्या कपड्यात १०-१२ तास मलमलच्या कापडात बांधून ते कुठेही टांगूनठेवा किवा एक चाळणीत ठेवून द्या. कपडा कोरडेपडल्यास थोडे पाणी शिंपडा. जेव्हा पावट्यांना लहान, पांढरे मोड(स्प्राउट्स) येतात तेव्हा ते तेव्हा ते खाण्यासाठी तयार असतात. सोलून त्याचा वापर करता येतो.
- बाहेरील साले काढून टाका आणि हे वाल आता कुठल्याही भाजी किवा उसळी मध्ये वापरता येतात. मोड जास्त लांब काढून नयेत नाहीतर वाल जास्त कडू होतात. भाज्यांना चांगली चव येत नाही.
- किसलेला नारळ,आले, लसूण, कोथिंबीर मिक्स करून बारीक पेस्ट करा. बाजूला ठेवा.
- कढईत तेल गरम करा.
- मोहरी आणि जिरे घाला. ते तडतडू द्या.
- बारीक चिरलेला कांदा घाला. पारदर्शक किवा गुलाबी होईपर्यंत शिजवा.
- त्यात हिंग,हळद, गरम मसाला किंवा गोडा मसाला, लाल तिखट, धने पाऊडर आणि जिरेपूड, मीठ, साखर घाला. मिसळा आणि १५ सेकंद शिजवा.
- बारीक चिरलेला टोमॅटो घाला. झाकण लावून मऊ होईपर्यंत शिजवा.
- टोमॅटो व्यवस्थित शिजल्यावर आधीच तयार केलेली नारळाची पेस्ट घाला. २-३ मिनिटे परतून घ्या.
- गरम पाणी घाला.ढवळा. वाल टाकून. हलक्या हाताने मिसळा.
- ताट ठेवून वाल १० ते १५ मिनिटे मंद आचेवर किंवा वाल मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.वाल बोटात घेतल्यावर ते तुटले पाहिजेत. त्याची पिठी करू नये.
- चिंचेची पेस्ट घाला. हलक्या हाताने ढवळावे.
- जशी ग्रेवि हवी असेल त्याप्रमाणे पाणी कमी जास्त ठेवून भाजी किवा भिरडे तयार करा. गॅस बंद करा.
- चपाती किंवा भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.
Notes
- वाल जास्त शिजवू नयेत. हाताच्या बोटांनी ते तोडून पहावेत. जर ते तुटत असतील आणि नरम झाले असतील तर ते शिजले समजावे.
- वाल कूकरला कधीही शिजवू नयेत.
- वालाची भाजी मोड न करता ही होते. त्यासाठी रात्रभर वाल भिजायला ठेवून सकाळी पाणी काढून टाकून त्याची साले काढवीत. साले काढताना थोडे पाणी ठेवावे.
- हिंगाचा वापर आवर्जून करावा.
वालाचे भिरडे | Lima Beans curry
“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…
अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable
अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices
ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…
टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)
“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…
झटपट पनीर भुर्जी
“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…
वांग्याची सुकी भाजी
“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…
उकडलेल्या अंड्यांची भाजी
“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…
बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)
बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….
मुळ्याची सुक्की भाजी
“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम चपाती,…
समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी
“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
मधातले फुल मखाने
मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…
फोडणीचा भात (पिवळा)
“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…
आले गुळाचा चहा
“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…
झटपट कोबीचे थालीपीठ
कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…
फोडशीच्या पानांची भजी
फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…
झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा
“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…
मिश्र भाज्यांचा रायता
“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…
गाजर काकडी घावन
“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…
केळ्याची गोड पुरी
मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…
खरबुज आंबा रायता
खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….
ओट्स रवा डोसा
ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…
गोड आंबा पुरी
मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस किंवा नुसती चहा बरोबर…
खरबुज जेली
जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…
फणसाचे अप्पे
फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे हे कडक आणि…
केळ्याचे शिकरण
केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…
मस्कमेलॉन(खरबूज) रस
मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…
कसुरी मेथी लच्छा मटरी
“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…
स्रम्बलेड अंडे
स्रम्बलेड अंडी (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…
शिंगाडा पिठाचे थालीपीठ
शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…
खमंग बीटरूट पुरी
बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…
उपवासाची केळ्याची भाजी
उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…
मेथीची भाजी
मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
पौष्टिक गाजर फलाफल
पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…
झटपट बेसन बुंदी
बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्या प्रकारे करता येते….
फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)
फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

बाजरीचे इडियप्पम
इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…
भेंडीची भाजी
“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…
नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry
ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…
दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney
“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…