लीमा बीन्स किंवा वाल किंवा पावटा रात्रभरपाण्यात भिजवून ठेवा किवा बाजारात सहज उपलब्ध असलेले अंकुरलेले आणि सोललेले वालवापरा.
भिजवलेले वालओल्या कपड्यात १०-१२ तास मलमलच्या कापडात बांधून ते कुठेही टांगूनठेवा किवा एक चाळणीत ठेवून द्या. कपडा कोरडेपडल्यास थोडे पाणी शिंपडा. जेव्हा पावट्यांना लहान, पांढरे मोड(स्प्राउट्स) येतात तेव्हा ते तेव्हा ते खाण्यासाठी तयार असतात. सोलून त्याचा वापर करता येतो.
बाहेरील साले काढून टाका आणि हे वाल आता कुठल्याही भाजी किवा उसळी मध्ये वापरता येतात. मोड जास्त लांब काढून नयेत नाहीतर वाल जास्त कडू होतात. भाज्यांना चांगली चव येत नाही.
किसलेला नारळ,आले, लसूण, कोथिंबीर मिक्स करून बारीक पेस्ट करा. बाजूला ठेवा.
कढईत तेल गरम करा.
मोहरी आणि जिरे घाला. ते तडतडू द्या.
बारीक चिरलेला कांदा घाला. पारदर्शक किवा गुलाबी होईपर्यंत शिजवा.
त्यात हिंग,हळद, गरम मसाला किंवा गोडा मसाला, लाल तिखट, धने पाऊडर आणि जिरेपूड, मीठ, साखर घाला. मिसळा आणि १५ सेकंद शिजवा.
बारीक चिरलेला टोमॅटो घाला. झाकण लावून मऊ होईपर्यंत शिजवा.
टोमॅटो व्यवस्थित शिजल्यावर आधीच तयार केलेली नारळाची पेस्ट घाला. २-३ मिनिटे परतून घ्या.
गरम पाणी घाला.ढवळा. वाल टाकून. हलक्या हाताने मिसळा.
ताट ठेवून वाल १० ते १५ मिनिटे मंद आचेवर किंवा वाल मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.वाल बोटात घेतल्यावर ते तुटले पाहिजेत. त्याची पिठी करू नये.
चिंचेची पेस्ट घाला. हलक्या हाताने ढवळावे.
जशी ग्रेवि हवी असेल त्याप्रमाणे पाणी कमी जास्त ठेवून भाजी किवा भिरडे तयार करा. गॅस बंद करा.
चपाती किंवा भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.