“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम चपाती, डाळ भात किंवा रोटी सोबत याची चव अप्रतिम लागते. कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी आणि तुरटपणा घालवण्यासाठी भाजलेले, ठेचलेले शेंगदाणे घालता येतात.किवा कोकणात ह्या भाजीत किसलेले ओले खोबरे घालतात. ही भाजी मुळ्याची कोवळी पाने आणि मुळा वापरुन करता येते.
मुळ्याची पाने, मुळा हे नैसर्गिक तुरट असतात. तुरटपना कमी करण्यासाठी मी भाजीत ताजे किसलेले खोबरे वापरले आहे. ही आमची पारंपारिक रेसिपी आहे. माझी आजी असाच प्रकारे ही भाजी करत असे आणि ती अगदी चवदार लागत असे. ह्यामुळे भाजीचा वास ही कमी होण्यास मदत होते.
कोकण किनारपट्टीच्या बाजूला राहणारे आपल्या जेवनात ओल्या किवा सुख्या खोबर्याचा खूप वापर करतात. भाजी, डाळ, वरण, उसळी किवा गोडाचे पदार्थ असोत, खोबर्याचा मुबलक वापर त्यांच्या जेवणात होतो.
मुळ्याची भाजी खूप प्रकारे बाजारात मिळते. भाजी जर कोवळी असेल तर त्यांना फक्त ताजी पानेच असतात. मुळा अगदी छोटा, छोटा किवा नसतोच.
मध्यम किवा मोठे मुळे असतील तर ती भाजी जून असते. त्याची चव एवढी खास लागत नाही.
मोठ्या मुळयानचा वापर हा बहुतांशी सॅलड, किवा पराठे बनवण्यासाठी केला जातो.
अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. ही भाजी पोटाच्या समस्यांवर किवा गॅस होणे ह्यासाठी बहुगुणी आहे.
साहित्य
- मुळा(raddish) – मुळ्याची भाजी खूप प्रकारे बाजारात मिळते. भाजी जर कोवळी असेल तर त्यांना फक्त ताजी पानेच असतात. मुळा अगदी छोटा, छोटा किवा नसतोच. खूप पाने असलेली आणि छोटा किवा मध्यम मुळा असलेली भाजीच वापरावी.

- कांदा – कांदे हा मुख्य अन्नघटक आहे. तो सर्रासपने सगळ्याच रेसिपीज मध्ये वापरला जातो. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते. तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते.
- लसूण – लसणीला ही उग्र वास आणि चव असते. ती जर शिजवून वापरली तर हा उग्रपणा नाहीसा होऊन तो पदार्थ चवदार होतो. कांद्याप्रमाणे लसणीचा वापर ही अतिशय मोठ्या प्रमाणावर स्यंपाकामध्ये केला जातो.
- मिरची – हिरवी मिरची जेवणात तिखटपणा आणण्यासाठी केला जातो. चवीनुसार तिखट, कमी तिखट मिरच्यांचा वापर जेवणात केला जातो. मिरच्यांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
- ओले खोबरे – कोकणात बहुतेकदा किसलेले ताजे खोबरे वापरले जाते. त्याने पदार्थाची चव वाढते.
कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज













साठवण
पालेभाजी ही ताजीच बनवून खाल्ली जाते. फ्रिज मध्ये ठेवल्याने भाजीची चव, रंग आणि पोषक तत्वे कमी होतात.
जर उरली असेल तर हवा बंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवावी. जास्त दिवस साठवून ठेवू नये.
महत्वाच्या टिप्स
- मुळा आणि पाने कोवळी असतील तर ती पटकन शिजतात.
- भाजी शिजताना झाकण लावून नये अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही. परंतु शिजवताना ती परतत राहावी जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही.
- मुळ्याची पाने व मुळा साफ करणे हे महत्त्वाचे आहे. माती वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ३ वेळा पाने स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.
- मुळ्याच्या भाजीला एकप्रकारचा वास असतो तो शिजल्या नंतर कमी होतो किवा जातो.
- मुळा (सफेद भाग) मध्यम किवा जाडा असेल तर प्रथम कांदा लसूण मिरची भाजल्यावर तो घालून 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यावा.
रेसिपी कार्ड

मुळ्याची सुक्की भाजी
Equipment
- १ पॅन/कढई
Ingredients
- १ मध्यम किवा किवा २ कप मुळ्याची जुडी – (बारीक कापून घेतलेला)
- १ १/२ मध्यम कांदा बारीक चिरून
- ३-४ लसूण पाकळ्या ठेचून
- २-३ हिरवी मिरची चिरून
- १ १/२ टेबलस्पून तेल
- मीठ – चवीनुसार
- २ टेबलस्पून किसलेला नारळ – किंवा भाजून ठेचलेले शेंगदाणे – २ टेबलस्पून
Instructions
- मुळ्याच्या जुडीला असलेला बारीक किवा मध्यम मुळा वेगळा तोडून बाजूला ठेवा.
- मुळा काढून साफ केलेली मुळ्याची पाने वाहत्या पाण्याखाली तीनदा धुऊन घ्या. अतिरिक्त पाणी काढून टाका.
- तशाच प्रकारे मुळा हा ही धूऊन आणि वाटल्यास सोलून घ्या. एकदम बारीक मुळे असतील तर ती कापून टाका. मुळा आणि मुळ्याची पाने बारीक चिरून घ्या.
- नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा.
- बारीक चिरलेला कांदा, मीठ घाला. कांदा थोडा लालसर-गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या.
- ठेचलेला किवा कापलेला लसूण, हिरवी मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत भाजून घ्या.
- मुळ्याची पाने घाला. नीट ढवळून घ्यावे आणि ८ ते १० मिनिटे शिजवून घ्या. भाजी जर कोवळी असेल तर ती लवकर शिजते. झाकण लावू नका अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही.
- ताजे किसलेले खोबरे घाला. चांगले मिसळा.
- चपाती किंवा डाळ-भातासोबत गरमा-गरम सर्व्ह करा.
Notes
-
- मुळा आणि पाने कोवळी असतील तर ती पटकन शिजतात.
-
- भाजी शिजताना झाकण लावून नये अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही. परंतु शिजवताना ती परतत राहावी जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही.
-
- मुळ्याची पाने व मुळा साफ करणे हे महत्त्वाचे आहे. माती वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ३ वेळा पाने स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.
-
- मुळ्याच्या भाजीला एकप्रकारचा वास असतो तो शिजल्या नंतर कमी होतो किवा जातो.
- मुळा (सफेद भाग) मध्यम किवा जाडा असेल तर प्रथम कांदा लसूण मिरची भाजल्यावर तो घालून 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यावा.
वालाचे भिरडे | Lima Beans curry
“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…
अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable
अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices
ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…
टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)
“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…
झटपट पनीर भुर्जी
“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…
वांग्याची सुकी भाजी
“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…
उकडलेल्या अंड्यांची भाजी
“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…
बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)
बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….
मुळ्याची सुक्की भाजी
“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम चपाती,…
समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी
“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
मधातले फुल मखाने
मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…
फोडणीचा भात (पिवळा)
“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…
आले गुळाचा चहा
“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…
झटपट कोबीचे थालीपीठ
कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…
फोडशीच्या पानांची भजी
फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…
झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा
“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…
मिश्र भाज्यांचा रायता
“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…
गाजर काकडी घावन
“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…
केळ्याची गोड पुरी
मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…
खरबुज आंबा रायता
खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….
ओट्स रवा डोसा
ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…
गोड आंबा पुरी
मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस किंवा नुसती चहा बरोबर…
खरबुज जेली
जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…
फणसाचे अप्पे
फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे हे कडक आणि…
केळ्याचे शिकरण
केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…
मस्कमेलॉन(खरबूज) रस
मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…
कसुरी मेथी लच्छा मटरी
“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…
स्रम्बलेड अंडे
स्रम्बलेड अंडी (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…
शिंगाडा पिठाचे थालीपीठ
शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…
खमंग बीटरूट पुरी
बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…
उपवासाची केळ्याची भाजी
उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…
मेथीची भाजी
मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
पौष्टिक गाजर फलाफल
पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…
झटपट बेसन बुंदी
बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्या प्रकारे करता येते….
फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)
फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

बाजरीचे इडियप्पम
इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…
भेंडीची भाजी
“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…
नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry
ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…
दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney
“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…