Go Back

मुळ्याची सुक्की भाजी

Sujata Hande-Parab
"मुळ्याची सुक्की भाजी" हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती, डाळ भात किंवा रोटी सोबत याची चव अप्रतिम लागते. कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी आणि तुरटपणा घालवण्यासाठी भाजलेले, ठेचलेले शेंगदाणे घालता येतात.किवा कोकणात ह्या भाजीत किसलेले ओले खोबरे घालतात. ही भाजी मुळ्याची कोवळी पाने आणि मुळा वापरुन करता येते.
मुळ्याची पाने, मुळा हे नैसर्गिक तुरट असतात. तुरटपना कमी करण्यासाठी मी भाजीत ताजे किसलेले खोबरे वापरले आहे. ही आमची पारंपारिक रेसिपी आहे. माझी आजी असाच प्रकारे ही भाजी करत असे आणि ती अगदी चवदार लागत असे.  ह्यामुळे भाजीचा वास ही कमी होण्यास मदत होते.
Prep Time 20 minutes
Cook Time 15 minutes
Total Time 35 minutes
Course Side Dish
Cuisine Indian
Servings 4 People

Equipment

  • १ पॅन/कढई

Ingredients
  

  • १ मध्यम किवा किवा २ कप मुळ्याची जुडी – (बारीक कापून घेतलेला)
  • १ १/२ मध्यम कांदा बारीक चिरून
  • ३-४ लसूण पाकळ्या ठेचून
  • २-३ हिरवी मिरची चिरून
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • मीठ - चवीनुसार
  • टेबलस्पून किसलेला नारळ - किंवा भाजून ठेचलेले शेंगदाणे - २ टेबलस्पून

Instructions
 

  • मुळ्याच्या जुडीला असलेला बारीक किवा मध्यम मुळा वेगळा तोडून बाजूला ठेवा.
  • मुळा काढून साफ केलेली मुळ्याची पाने वाहत्या पाण्याखाली तीनदा धुऊन घ्या.  अतिरिक्त पाणी काढून टाका.
  • तशाच प्रकारे मुळा हा ही धूऊन आणि वाटल्यास सोलून घ्या. एकदम बारीक मुळे असतील तर ती कापून टाका. मुळा आणि मुळ्याची पाने बारीक चिरून घ्या.  
  • नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा.
  • बारीक चिरलेला कांदा, मीठ घाला. कांदा थोडा लालसर-गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या.
  • ठेचलेला किवा कापलेला लसूण, हिरवी मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत भाजून घ्या.
  • मुळ्याची पाने घाला. नीट ढवळून घ्यावे आणि ८ ते १० मिनिटे शिजवून घ्या. भाजी जर कोवळी असेल तर ती लवकर शिजते.
    झाकण लावू नका अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही.
  • ताजे किसलेले खोबरे घाला. चांगले मिसळा.
  • चपाती किंवा डाळ-भातासोबत गरमा-गरम सर्व्ह करा.

Notes

    • मुळा आणि पाने कोवळी असतील तर ती पटकन शिजतात.
    • भाजी शिजताना झाकण लावून नये अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही. परंतु शिजवताना ती परतत राहावी जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही.
    • मुळ्याची पाने व मुळा साफ करणे हे महत्त्वाचे आहे. माती वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ३ वेळा पाने स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.
    • मुळ्याच्या भाजीला एकप्रकारचा वास असतो तो शिजल्या नंतर कमी होतो किवा जातो.
    • मुळा (सफेद भाग) मध्यम किवा जाडा असेल तर प्रथम कांदा लसूण मिरची भाजल्यावर तो घालून 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यावा. 
Keyword leafy vegetable, quick, raddish leaves, पालेभाजी, मुळा पाने