sujataparabrecipes

ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते.

पारंपरिक पद्धतीत लिंबाचा रस किवा कोथिंबीर वापरली जात नाही. मी ह्या रेसिपीत बटाटे काळे पडू नयेत आणि आंबटपणा आल्यामुळे ह्याची चव ही छान लागते म्हणून वापरले आहेत. कोथिंबीरीने ही चव छान लागते. हे दोन्ही घटक पर्यायी आहेत.

तांदळाचे पीठ ही पर्यायी आहे. पण ते घातले तर काप लवकर भाजतात आणि कुरकुरीत ही होतात.

बहुतेक वेळा डाळ-भाता बरोबर खाण्यास काही ही नसते किवा भाजी वैगरे करायला वेळ नसतो. अशा वेळेला ही रेसिपी फार पटकन बनते आणि अतिशय रुचकर ही लागते. तळणे नसल्यामुळे तेलाचा वापर ही कमी होतो.

ही डिश माझ्या नवरोबांच्या फार आवडीची आहे. इनफॅक्ट ही डिश त्यांनीच मला शिकवलेली आहे. गोवन असल्यामुळे त्या पद्धतीच्या रेसिपी शिकणे आणि करणे हे क्रमप्राप्त होतेच. अश्या बर्‍याच रेसिपी मी माझ्या पुढील ब्लॉग वर टाकेन.

चला तर मग पाहूया ही पाककृती! 😊

साहित्य

  • बटाटे – कुठल्याही प्रकारचे मध्यम किवा मोठ्या आकाराचे बटाटे चालतील.
  • लिंबाचा रस – लिंबाचा रस वापरल्याने कापे काळी पडत नाहीत आणि चवही मस्त लागते.
  • लाल मसाला – तिखटपणा आणण्यासाठी ह्याचा वापर होते. कुठल्याही ब्रॅंडचा वापरला तरी चालतो.

कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज

साठवण

ताजेच करून खावेत. उरले असतील तर हवाबंद डब्यात ठेवून द्यावेत. 3 ते 4 दिवस चांगले राहतात. परत जेव्हा खाण्यास घ्यावयाचे असतील तेव्हा परत तव्यावर गरम करून घ्यावेत.

महत्वाच्या टिप्स

  • बटाटे जास्त पातळ कापून घेऊ नयेत.
  • व्यवसतिथ धूऊन घेतले तर साले काढण्याची गरज भासत नाही. साले काढून घेणे हे पर्यायी आहे.
  • भाजायला वेळ लागणार असेल तर लिंबाच्या रसाचा वापर करावा.
  • लिंबाचा रस किवा कोथिंबीर पर्यायी आहेत.
  • रवा बारीक वापरावा.
  • तिखट आवडत असेल तर प्रमाण थोडे वाढवू शकतो.

रेसिपी कार्ड

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

Sujata Hande-Parab
ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्सम्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते.
पारंपरिक पद्धतीत लिंबाचा रस किवा कोथिंबीर वापरली जात नाही. मी ह्या रेसिपीत बटाटे काळे पडू नयेत आणि आंबटपणा आल्यामुळे ह्याची चव ही छान लागते म्हणून वापरले आहेत. कोथिंबीरीने ही चव छान लागते.हे दोन्ही घटक पर्यायी आहेत. तांदळाचे पीठ ही पर्यायी आहे.
Prep Time 20 minutes
Cook Time 15 minutes
Total Time 35 minutes
Course Appetizer, Side Dish
Cuisine Indian
Servings 4 people

Equipment

  • १ नॉनस्टिक पॅन/लोखंडी तवा

Ingredients
  

  • २ मोठे बटाटे – (गोल कापलेले)
  • १/४ कप रवा
  • टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • टीस्पून लाल तिखट तिखट आवडत असेल तर प्रमाण थोडे वाढवू शकतो.
  • टीस्पून गरम मसाला
  • १/२ टेबलस्पून लिंबाचा रस
  • टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
  • १/२ – ३/४ टीस्पून हळद पावडर
  • चवीनुसार मीठ
  • ४ ते ५ टेबलस्पून तळण्यासाठी तेल

Instructions
 

  • बटाटे धुवा, सोलून घ्या आणि थोडे जाड काप (सुमारे १/४" जाड) करा.
  • सर्व बटाटे कापून झाल्यावर त्यात मीठ, लिंबाचा रस, गरम मसाला, लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. चांगले मिसळा.
  • मॅरीनेशनसाठी ५-७ मिनिटे बाजूला ठेवा
  • एका पॅनमध्ये थोडे तेल घाला आणि संपूर्णपृष्ठभागावर पसरवा. गॅस कमी-मध्यम करा.
  • एका प्लेटमध्ये रवा पसरवा. बटाट्याचे तुकडे चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूंनी कवर किवा कोट करून घ्या.  
  • हे बटाट्याचे तुकडे तेल गरम केलेल्या नॉनस्टिक पॅनवर हलक्या हाताने ठेवा आणि एक बाजू तपकिरी होईपर्यंत तळू द्या. ताटाने किवा प्लेट ने त्याला झाकून ठेवले तरी चालेल. साधारणत: एक बाजू भाजायला ७ ते ९ मिनिटे वेळ जातो. भाजने हे तुम्ही केलेल्या कापाच्या साइज वर ही अवलंबून असते. काही वेळा बटाटे लवकर शिजतात किवा ते शिजताना बराच वेळ देखील घेतात.
  • बटाट्याचे काप उलटा. आवश्यक असल्यास पॅनमध्ये तेलाचे काही थेंब टाका.
  • दुसरी बाजू तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • सर्व बटाट्याचे तुकडे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • गरम सर्व्ह करा. हे डाळ-भात बरोबर अतिशय चवदार लागतात.

Notes

    • बटाटे जास्त पातळ कापून घेऊ नयेत.
    • व्यवसतिथ धूऊन घेतले तर साले काढण्याची गरज भासत नाही. साले काढून घेणे हे पर्यायी आहे.
    • भाजायला वेळ लागणार असेल तर लिंबाच्या रसाचा वापर करावा.
    • लिंबाचा रस किवा कोथिंबीर पर्यायी आहेत.
    • रवा बारीक वापरावा. जाड रवा असेल तर बारीक करून घ्यावा. 
    • तिखट आवडत असेल तर प्रमाण थोडे वाढवू शकतो.
Keyword easy, indian side dish, kids friendly, pakoda, potato Slices, quick, काप, रवा
वालाचे भिरडे | Lima Beans curry

वालाचे भिरडे | Lima Beans curry

“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…

झटपट पनीर भुर्जी

झटपट पनीर भुर्जी

“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…

वांग्याची सुकी भाजी

वांग्याची सुकी भाजी

“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…

उकडलेल्या अंड्यांची भाजी

उकडलेल्या अंड्यांची भाजी

“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….

मुळ्याची सुक्की भाजी

मुळ्याची सुक्की भाजी

“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,…

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

मधातले फुल मखाने

मधातले फुल मखाने

मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…

फोडणीचा भात (पिवळा)

फोडणीचा भात (पिवळा)

“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…

आले गुळाचा चहा

आले गुळाचा चहा

“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…

झटपट कोबीचे थालीपीठ

झटपट कोबीचे थालीपीठ

कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…

फोडशीच्या पानांची भजी

फोडशीच्या पानांची भजी

फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…

मिश्र भाज्यांचा रायता

मिश्र भाज्यांचा रायता

“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…

गाजर काकडी घावन

गाजर काकडी घावन

“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…

केळ्याची गोड पुरी

केळ्याची गोड पुरी

मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…

गोड आंबा पुरी

गोड आंबा पुरी

मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस  किंवा नुसती चहा बरोबर…

खरबुज जेली

खरबुज जेली

जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…

फणसाचे अप्पे

फणसाचे अप्पे

फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे  हे कडक आणि…

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला  “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…

कसुरी मेथी लच्छा मटरी

कसुरी मेथी लच्छा मटरी

“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडी  (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…

खमंग बीटरूट पुरी

खमंग बीटरूट पुरी

बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…

पालक पुरी

पालक पुरी

पुरी ही एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. पुरी विविध प्रकारे बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये पुरीला प्रथम स्थान आहे. पुरी- भाजी, पुरी-श्रीखंड…

मेथीची भाजी

मेथीची भाजी

मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…

झटपट बेसन बुंदी

झटपट बेसन बुंदी

बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्‍या प्रकारे करता येते….

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

No Thumbnail Found

बाजरीचे इडियप्पम

इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी

“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recipe Rating




error: Content is protected !!