sujataparabrecipes

सँडविचचा पिझ्झा किवा पिझ्झा सँडविच हा अगदी वेगळा प्रकार आहे. ब्रेडवर पिझ्झा टॉपिंग्स,सॉस, किसलेले मोझ्झरेला चीज किंवा प्रोसिस्ज्ड चीज वापरून त्याला दुसर्‍या ब्रेड स्लाइस ने कव्हर करून टोस्ट केलेला हा प्रकार अतिशय स्वादिष्ट लागतो.

लहान मुलांच्या डब्याला अतिशय उत्तम असा पर्याय आहे. मुले सहसा भाज्या खाण्यास टाळाटाळ करतात. असा प्रकारे भाज्याही त्यांना मिळतात आणि ती आवडीने खातात. आपल्या आवडीप्रमाणे भाज्या किंवा नॉनव्हेज टाकून  ही हा पिझ्झा बनवता येतो.

साहित्य

  • ब्राउन ब्रेड  – सफेद ब्रेड पेक्षा ब्राऊन ब्रेड हा हेलथी पर्याय आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण ब्रेड वापरू शकतो.
  • पिझ्झा सॉस – मी विकत आणलेला पिझ्झा सॉस वापरलेला आहे. काही ठिकाणी टोमॅटो सॉस वापरला जातो पण त्याची चव काही खास लागत नाही. पिझ्झा सॉस ने चव अप्रतिम लागते.
  • ओरेगॅनो – ओरेगॅनो हे हर्ब आहे. ओरेगॅनो वनस्पती हि तुळशीसारखी दिसते. त्याच्या पानांना विशीष्ट प्रकारचा सुगंध असतो. त्यामुळे ओरेगॅनोचा वापर आपण पिझ्झा, पास्ता आणि इतर पदार्थांमध्ये मसाला म्हणून करू शकतो. त्याची पाने सुकवून ती पाहिजे तेव्हा वापरता येतात.
  • काळी मिरी पावडर – कालीमिरी कुठून किवा त्याची पावडर ही बहुतेक पदार्था मध्ये वापरली जाते. तिखट असल्याकारणाने त्याचा वापर अगदी कमी प्रकारे करतात.
  • लाल तिखट फ्लेक्स – लाल मिरची जाडसर कुठून त्याचे चिली फ्लेक्स बनविले जातात. तिखटपणा आणण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो.
  • मोझ्झेरेल्ला चीज किवा प्रोकेस्सेड चीज – चीज विविध प्रकारचे असते. पिझ्झा, पास्ता किवा इटालियन जेवणामध्ये ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मोझ्झेरेल्ला चीज हे स्ट्रेची असते आणि त्याची चव अप्रतिम असते. बहुतेक ठिकाणी ह्याचा वापर केला जातो. हे चीज आवडीने खाल्ले जाते. पण हे चीज नसेल तर प्रोसेस्सेड चीज ह्या रेसिपी मध्ये वापरले तरी चालते. प्रोसेस चीज ची चव आणि टेक्स्टचर वेगळे असते.

कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज

साठवण (स्टोरेज)

हा साठवून ठेवू शकत नाही. ब्रेड सॉगी होण्याची शक्यता असते.

महत्वाच्या टिप्स

  • जर वाटत असेल तर ब्रेडच्या जाड कडा कापून घेतल्या तरी चालतील.
  • भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता.
  • हा गरम गरमच करावा नाहीतर ब्रेड सॉगी होण्याची शक्यता असते.

रेसिपी कार्ड

पिझ्झा सँडविच

Sujata Hande-Parab
सँडविचचा पिझ्झा हा अगदी वेगळा प्रकार आहे. ब्रेडवर पिझ्झा टॉपिंग्स,सॉस, किसलेले मोझ्झरेला चीज किंवा प्रोसिस्ज्ड चीज वापरून त्याला दुसर्‍या ब्रेड स्लाइस ने कव्हर करून टोस्ट केलेला हा प्रकार अतिशय स्वादिष्ट लागतो.
Prep Time 10 minutes
Cook Time 3 minutes
Total Time 13 minutes
Course Appetizer, Snack
Cuisine Indian, Italian
Servings 2 people

Equipment

  • १ सँडविच टोस्टर

Ingredients
  

  • २-३ बेबी कॉर्न पातळ काप करून घेतलेले
  • १/४ कप हिरवी शिमला मिरची बारीक कापलेली

सँडविच साठी

  • ३-४ तुकडे ब्राउन ब्रेड 
  • १-२   टेबलस्पून बटर
  • १-२ टेबलस्पून + १/२ टेबलस्पून पिझ्झा सॉस – ब्रेडला लावण्यासाठी + टॉपिंगला लावण्यासाठी 
  • टीस्पून लाल तिखट फ्लेक्स
  • १/२ टीस्पून काळी मिरी पावडर
  • टीस्पून ओरेगॅनो
  • ४-५ टेबलस्पून किसलेले मोझ्झेरेल्ला चीज किवा प्रोकेस्सेड चीज

Instructions
 

  • एका प्लेट मध्ये पातळ काप केलेले बेबी कॉर्न्स आणि शिमला मिरची घेऊन त्यात पिझ्झा सॉस मिक्स करून ते व्यवस्तिथ कोट करून घ्या.
  • ब्रेडच्या एका तुकड्यावर बटर लावून घ्या.
  • १/२ टीस्पून किंवा थोडा पिझ्झा सॉस घेऊन सगळ्या दुसर्‍या ब्रेडवर व्यवस्तिथ पसरवून घ्या
  • त्यावर पिझ्झा सॉस कोटेड भाज्यांची टॉपिंग टाका. थोडीच टाका.
  • एका प्लेट मध्ये ओरेगॅनो आणि काळीमिरी मिक्स करून घ्या. ती त्या टॉपिंगवर पसरावा.
  • थोडे लाल तिखट फ्लेक्स पसरवून घ्या. थोडे थोडे टाका.  किसलेले मोझ्झेरेल्ला चीज व्यवस्तिथ टॉपिंगवर पसरवून घ्या.
  • त्यावर बटर लावलेला दुसरा ब्रेडचा तुकडा ठेवा आणि सँडविच मेकर मध्ये ग्रिल करून घ्या.
  • २ मिनिटांनी दुसऱ्या बाजूला परतून घेऊन परत २ मिनिटे किंवा क्रिस्पी होईपर्यंत ग्रिल करून घ्या.
  • कापून गरम करम सर्व्ह करा किंवा टिफिन मध्ये भरून द्या.

Notes

  • जर वाटत असेल तर ब्रेडच्या जाड कडा कापून घेतल्या तरी चालतील.
  • भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता.
  • हा गरम गरम च करावा नाहीतर ब्रेड सॉगी होण्याची शक्यता असते.
Keyword bread, fusion, kids, kids friendly
वालाचे भिरडे | Lima Beans curry

वालाचे भिरडे | Lima Beans curry

“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…

झटपट पनीर भुर्जी

झटपट पनीर भुर्जी

“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…

वांग्याची सुकी भाजी

वांग्याची सुकी भाजी

“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…

उकडलेल्या अंड्यांची भाजी

उकडलेल्या अंड्यांची भाजी

“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….

मुळ्याची सुक्की भाजी

मुळ्याची सुक्की भाजी

“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,…

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

मधातले फुल मखाने

मधातले फुल मखाने

मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…

फोडणीचा भात (पिवळा)

फोडणीचा भात (पिवळा)

“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…

आले गुळाचा चहा

आले गुळाचा चहा

“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…

झटपट कोबीचे थालीपीठ

झटपट कोबीचे थालीपीठ

कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…

फोडशीच्या पानांची भजी

फोडशीच्या पानांची भजी

फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…

मिश्र भाज्यांचा रायता

मिश्र भाज्यांचा रायता

“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…

गाजर काकडी घावन

गाजर काकडी घावन

“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…

केळ्याची गोड पुरी

केळ्याची गोड पुरी

मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…

गोड आंबा पुरी

गोड आंबा पुरी

मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस  किंवा नुसती चहा बरोबर…

खरबुज जेली

खरबुज जेली

जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…

फणसाचे अप्पे

फणसाचे अप्पे

फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे  हे कडक आणि…

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला  “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…

कसुरी मेथी लच्छा मटरी

कसुरी मेथी लच्छा मटरी

“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडी  (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…

खमंग बीटरूट पुरी

खमंग बीटरूट पुरी

बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…

पालक पुरी

पालक पुरी

पुरी ही एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. पुरी विविध प्रकारे बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये पुरीला प्रथम स्थान आहे. पुरी- भाजी, पुरी-श्रीखंड…

मेथीची भाजी

मेथीची भाजी

मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…

झटपट बेसन बुंदी

झटपट बेसन बुंदी

बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्‍या प्रकारे करता येते….

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

No Thumbnail Found

बाजरीचे इडियप्पम

इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी

“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recipe Rating




error: Content is protected !!