Go Back

पिझ्झा सँडविच

Sujata Hande-Parab
सँडविचचा पिझ्झा हा अगदी वेगळा प्रकार आहे. ब्रेडवर पिझ्झा टॉपिंग्स,सॉस, किसलेले मोझ्झरेला चीज किंवा प्रोसिस्ज्ड चीज वापरून त्याला दुसर्‍या ब्रेड स्लाइस ने कव्हर करून टोस्ट केलेला हा प्रकार अतिशय स्वादिष्ट लागतो.
Prep Time 10 minutes
Cook Time 3 minutes
Total Time 13 minutes
Course Appetizer, Snack
Cuisine Indian, Italian
Servings 2 people

Equipment

  • १ सँडविच टोस्टर

Ingredients
  

  • २-३ बेबी कॉर्न पातळ काप करून घेतलेले
  • १/४ कप हिरवी शिमला मिरची बारीक कापलेली

सँडविच साठी

  • ३-४ तुकडे ब्राउन ब्रेड 
  • १-२   टेबलस्पून बटर
  • १-२ टेबलस्पून + १/२ टेबलस्पून पिझ्झा सॉस – ब्रेडला लावण्यासाठी + टॉपिंगला लावण्यासाठी 
  • टीस्पून लाल तिखट फ्लेक्स
  • १/२ टीस्पून काळी मिरी पावडर
  • टीस्पून ओरेगॅनो
  • ४-५ टेबलस्पून किसलेले मोझ्झेरेल्ला चीज किवा प्रोकेस्सेड चीज

Instructions
 

  • एका प्लेट मध्ये पातळ काप केलेले बेबी कॉर्न्स आणि शिमला मिरची घेऊन त्यात पिझ्झा सॉस मिक्स करून ते व्यवस्तिथ कोट करून घ्या.
  • ब्रेडच्या एका तुकड्यावर बटर लावून घ्या.
  • १/२ टीस्पून किंवा थोडा पिझ्झा सॉस घेऊन सगळ्या दुसर्‍या ब्रेडवर व्यवस्तिथ पसरवून घ्या
  • त्यावर पिझ्झा सॉस कोटेड भाज्यांची टॉपिंग टाका. थोडीच टाका.
  • एका प्लेट मध्ये ओरेगॅनो आणि काळीमिरी मिक्स करून घ्या. ती त्या टॉपिंगवर पसरावा.
  • थोडे लाल तिखट फ्लेक्स पसरवून घ्या. थोडे थोडे टाका.  किसलेले मोझ्झेरेल्ला चीज व्यवस्तिथ टॉपिंगवर पसरवून घ्या.
  • त्यावर बटर लावलेला दुसरा ब्रेडचा तुकडा ठेवा आणि सँडविच मेकर मध्ये ग्रिल करून घ्या.
  • २ मिनिटांनी दुसऱ्या बाजूला परतून घेऊन परत २ मिनिटे किंवा क्रिस्पी होईपर्यंत ग्रिल करून घ्या.
  • कापून गरम करम सर्व्ह करा किंवा टिफिन मध्ये भरून द्या.

Notes

  • जर वाटत असेल तर ब्रेडच्या जाड कडा कापून घेतल्या तरी चालतील.
  • भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता.
  • हा गरम गरम च करावा नाहीतर ब्रेड सॉगी होण्याची शक्यता असते.
Keyword bread, fusion, kids, kids friendly