sujataparabrecipes

कोको किवा कॉफी पावडर वापरून चॉकलेट केक (स्पंज) Chocolate cake केक तयार केला जातो.  हा बेसिक चॉकलेट स्पंज वापरुन विविध प्रकारचे लेयरड केक तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतो.

केक ज्याला आवडत नाही अशी व्यक्ति शोधुनही सापडणार नाही. आजकाल तर कुठल्याही कार्यक्रमाला केक कापणे ही एक प्रथा झाली आहे. असाच काही केकच्या रेकिपीजसाठी हा चोकोलेट स्पोंज वापरण्यात येतो.

आमच्या घरी लहानपणी केक म्हटले की काही खूप मोठे असे सेलिब्रेशन सारखे फीलिंग येत असे. केक आणणे आणि खाणे हे खूप कमीच होत असे. आम्हाला ही ह्या अश्या केक ची खूप क्रेझ आणि उस्तूकता अशी असे. त्यावेळी केक चे आता सारखे बरेचसे प्रकारही न्हावते किवा आम्हाला तरी माहिती न्हावते. दोनच केक ते म्हणजे चोकोलेट केक आणि क्रीम केक.

त्यामुळे मोठे आणि त्यातल्यात्यात लग्न झाल्यावर बेकिंग हा प्रकार भलताच आवडू लागला. मग त्यासाठी स्पेशल मायक्रोवेव, आणि बेकिंग साठी लागणारे सगळेच हवे असणारे आणि नको असणारे सामान घरी येऊ लागले. विविध प्रकारच्या रेसिपीच घरीच बानु लागल्या. केक, कपकेक, ब्रेड, पाव, बिस्किटे असे बरेच पदार्थ घरच्या घरी बनवू लागलो.

त्यातीलच जी मी अगदी पहिल्यांदा जी रेसिपी बनवली आणि नंतर ती बर्‍याच वेळा बनवली ती म्हणजे चॉक्लेट स्पोंज.

साहित्य

  • मैदा – पारंपरिक अमेरिकन किवा कॉन्टिनेन्टल पाककृतींमध्ये मैदाचा वापर केला जातो.
  • बेकिंग पावडर / बेकिंग सोडा – ह्याचा वापर केक किवा पॅनकेक फुलवण्यासाठी किवा स्पोंजी बनवण्यासाठी केला जातो. कुठल्याही कंपनीचा/ब्रॅंडचा वापरला तरी चालतो.
  • कोको पावडर – कोको पाऊडर ही बर्‍याच ब्रॅंड मध्ये उपलब्ध असते. मी वायेकफील्ड(weikfield) ब्रॅंडची वापरली आहे.
  • साखर – साखर किवा पिठी साखर वापरावी. मुख्यतः पिठीसाखरच वापरावी. आणि ती वापरत असल्यास चाळून घ्यावी.
  • दही – दही हे ताजे आणि गोड असावे. मुख्यतः अंड्याचा वापर केक मध्ये केला जातो त्यामुळे केक अगदी हलका बनण्यास मदत होते. ह्या रेसिपीत अंड्या ऐवजी दही घातले आहे.
  • व्हॅनिला एसेन्स – फ्लेवर साठी ह्याचा वापर केला जातो. हे बाजारात सहजरित्या उपलब्ध असते.

कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज

साठवण

केक फ्लिप करा आणि वायर रॅकवर थंड होऊ द्या. नंतर तो फ्रीज मध्ये ठेवून द्या. थोडा थंड झाला की त्याला क्लिंग रॅप मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवून द्या.

महत्वाच्या टिप्स

  • केक तयार करताना सर्व घटक सामान्य तापमानवर असावेत.
  • मैदा दोन-तीनदा चाळल्याने अशुद्धता निघून जाते आणि केक स्पॉन्जी बनतो.
  • जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर थोडे साधे दूध घालू शकता.
  • कुठल्याही फळांचे क्रश किवा घट्ट रस वापरत असल्यास ते थोडे कोमट पाणी किंवा साखरेचे पाणी घालून पातळ करा.

रेसिपी कार्ड

चॉकलेट केक (स्पंज)

Sujata Hande-Parab
कोको किवा कॉफी पावडर वापरून चॉकलेट केक (स्पंज) केक तयार केला जातो.  हा बेसिक चॉकलेट स्पंज वापरुन विविध प्रकारचे लेयरड केक तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतो.
केक ज्याला आवडत नाही अशी व्यक्ति शोधुनही सापडणार नाही. आजकाल तर कुठल्याही कार्यक्रमाला केक कापणे ही एक प्रथा झाली आहे. असाच काही केकच्या रेसीपीज साठी हा चोकोलेट स्पंज वापरण्यात येतो.
Prep Time 15 minutes
Cook Time 32 minutes
Total Time 47 minutes
Course Dessert
Cuisine Continental
Servings 6 people

Equipment

  • १ ओवन/Oven/OTG

Ingredients
  

  • १ १/२ कप मैदा + १ टीस्पून टिनला लावण्यासाठी (बटर पेपर वापरत असल्यास मैदा आणि तेल टिनला लावू नये.)
  • टीस्पून बेकिंग पावडर
  • १/२ टीस्पून बेकिंग सोडा
  • चमचे कोको पावडर (गोड नसनारी)
  • मीठ एक छोटी चिमूटभर मीठ
  • १/२ कप तेल + १ टीस्पून टिनला लावण्यासाठी (ऑलिव तेल किवा सूर्यफूल तेल कुठलेही वास न येणारे तेल)
  • १/२ कप साखर (आपल्या चवीनुसार थोडी कमी करू शकता)
  • १/२ कप दही
  • टीस्पून व्हॅनिला एसेन्स

कॉफी

  • कॉफी पावडर
  • कोमट पाणी

Instructions
 

  • ओव्हन १८० डिग्री सेल्सियस वर गरम करा.
  • सर्व ओले साहित्य जसे की तेल, व्हॅनिला इसेन्स, दही, दूध एका भांड्यात मिक्स करा. साखर घाला. साखर विरघळे पर्यंत आणि मिश्रण फ्लफी होईपर्यंत चांगले फेटून घ्या.
  • थोड्या कोमट पाण्यात झटपट कॉफी पावडर घाला. चांगले मिसळा. तेल-दही मिश्रणात घाला. चांगले फेटून घ्या.
  • मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर एकत्र दोन-तीनदा चाळून घ्या. मीठ घालावे. चांगले मिसळा. बाजूला ठेवा.
  • कोरडे घटक हळूहळू ओल्या मिश्रणात मिसळा. हळूवारपणे मिसळा. (कोंसिस्टंसी अॅडजस्ट करण्यासाठी आवश्यक असल्यास साधे दूध घाला)
  • बेकिंग पॅनला तेलाने ग्रीस करा. पीठ भुरभुरून ते समान रीतीने टिनमध्ये पसरवा. किवा बटर पेपर (बेकिंगचा) केक टिनच्या मापाचा कापून घ्याआणि पॅन किवा टिनच्या तळाला लावून घ्या.
  • केकचे तयार मिश्रण टिन मध्ये घाला. टिनला हलकेच टॅप करा आणि एका टुथ पीक पिठात फिरवून घ्या परत टॅप करा, जेणे करून पिठ समान रीतीने पसरेल. तसेच जर मिश्रणात हवेचे बुडबुडे असतील तर ते ही निघून जातील आणि केक बेक झाल्यावर वर फुगाही येणार नाही.
  • प्रीहिटेड(आधीच गरम करून घेतलेल्या) ओवन मध्ये 25-28 मिनिटे बेक करावे. टूथ पिक घाला, ते स्वच्छ बाहेर आले पाहिजे. केक टिन काउंटरवर 5 मिनिटे ठेवून द्या.
  • केक फ्लिप करा आणि वायर रॅकवर थंड होऊ द्या. नंतर तो फ्रीज मध्ये ठेवून द्या. थोडा थंड झाला की त्याला क्लिंग रॅप मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवून द्या.
  • पूर्ण थंड झाल्यावर, सेरेटेड चाकू वापरून स्पंज केक व्यवयासतिथ सगळ्या बाजूंनी काळजी पूर्वक कापून त्याचे आडवे दोन ते तीन भाग करून घ्या, अशा प्रकारे आपले स्पंज बनतील. हे स्पंज नंतर चॉकलेट गणाश किंवा व्हीप्ड क्रीम किंवा फळे इ. वापरुन फ्रॉस्ट करून सर्व्ह करा.

Notes

  • केक तयार करताना सर्व घटक सामान्य तापमानवर असावेत.
  • मैदा दोन-तीनदा चाळल्याने अशुद्धता निघून जाते आणि केक स्पॉन्जी बनतो.
  • जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर थोडे साधे दूध घालू शकता.
  • कुठल्याही फळांचे क्रश किवा घट्ट रस वापरत असल्यास ते थोडे कोमट पाणी किंवा साखरेचे पाणी घालून पातळ करा.
Keyword bake, cake, chocolate, chocolate cake, केक, चोकोलेट, चोकोलेट केक
वालाचे भिरडे | Lima Beans curry

वालाचे भिरडे | Lima Beans curry

“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…

झटपट पनीर भुर्जी

झटपट पनीर भुर्जी

“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…

वांग्याची सुकी भाजी

वांग्याची सुकी भाजी

“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…

उकडलेल्या अंड्यांची भाजी

उकडलेल्या अंड्यांची भाजी

“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….

मुळ्याची सुक्की भाजी

मुळ्याची सुक्की भाजी

“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,…

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

मधातले फुल मखाने

मधातले फुल मखाने

मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…

फोडणीचा भात (पिवळा)

फोडणीचा भात (पिवळा)

“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…

आले गुळाचा चहा

आले गुळाचा चहा

“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…

झटपट कोबीचे थालीपीठ

झटपट कोबीचे थालीपीठ

कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…

फोडशीच्या पानांची भजी

फोडशीच्या पानांची भजी

फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…

मिश्र भाज्यांचा रायता

मिश्र भाज्यांचा रायता

“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…

गाजर काकडी घावन

गाजर काकडी घावन

“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…

केळ्याची गोड पुरी

केळ्याची गोड पुरी

मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…

गोड आंबा पुरी

गोड आंबा पुरी

मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस  किंवा नुसती चहा बरोबर…

खरबुज जेली

खरबुज जेली

जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…

फणसाचे अप्पे

फणसाचे अप्पे

फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे  हे कडक आणि…

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला  “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…

कसुरी मेथी लच्छा मटरी

कसुरी मेथी लच्छा मटरी

“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडी  (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…

खमंग बीटरूट पुरी

खमंग बीटरूट पुरी

बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…

पालक पुरी

पालक पुरी

पुरी ही एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. पुरी विविध प्रकारे बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये पुरीला प्रथम स्थान आहे. पुरी- भाजी, पुरी-श्रीखंड…

मेथीची भाजी

मेथीची भाजी

मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…

झटपट बेसन बुंदी

झटपट बेसन बुंदी

बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्‍या प्रकारे करता येते….

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

No Thumbnail Found

बाजरीचे इडियप्पम

इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी

“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recipe Rating




error: Content is protected !!