Go Back

चॉकलेट केक (स्पंज)

Sujata Hande-Parab
कोको किवा कॉफी पावडर वापरून चॉकलेट केक (स्पंज) केक तयार केला जातो.  हा बेसिक चॉकलेट स्पंज वापरुन विविध प्रकारचे लेयरड केक तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतो.
केक ज्याला आवडत नाही अशी व्यक्ति शोधुनही सापडणार नाही. आजकाल तर कुठल्याही कार्यक्रमाला केक कापणे ही एक प्रथा झाली आहे. असाच काही केकच्या रेसीपीज साठी हा चोकोलेट स्पंज वापरण्यात येतो.
Prep Time 15 minutes
Cook Time 32 minutes
Total Time 47 minutes
Course Dessert
Cuisine Continental
Servings 6 people

Equipment

  • १ ओवन/Oven/OTG

Ingredients
  

  • १ १/२ कप मैदा + १ टीस्पून टिनला लावण्यासाठी (बटर पेपर वापरत असल्यास मैदा आणि तेल टिनला लावू नये.)
  • टीस्पून बेकिंग पावडर
  • १/२ टीस्पून बेकिंग सोडा
  • चमचे कोको पावडर (गोड नसनारी)
  • मीठ एक छोटी चिमूटभर मीठ
  • १/२ कप तेल + १ टीस्पून टिनला लावण्यासाठी (ऑलिव तेल किवा सूर्यफूल तेल कुठलेही वास न येणारे तेल)
  • १/२ कप साखर (आपल्या चवीनुसार थोडी कमी करू शकता)
  • १/२ कप दही
  • टीस्पून व्हॅनिला एसेन्स

कॉफी

  • कॉफी पावडर
  • कोमट पाणी

Instructions
 

  • ओव्हन १८० डिग्री सेल्सियस वर गरम करा.
  • सर्व ओले साहित्य जसे की तेल, व्हॅनिला इसेन्स, दही, दूध एका भांड्यात मिक्स करा. साखर घाला. साखर विरघळे पर्यंत आणि मिश्रण फ्लफी होईपर्यंत चांगले फेटून घ्या.
  • थोड्या कोमट पाण्यात झटपट कॉफी पावडर घाला. चांगले मिसळा. तेल-दही मिश्रणात घाला. चांगले फेटून घ्या.
  • मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर एकत्र दोन-तीनदा चाळून घ्या. मीठ घालावे. चांगले मिसळा. बाजूला ठेवा.
  • कोरडे घटक हळूहळू ओल्या मिश्रणात मिसळा. हळूवारपणे मिसळा. (कोंसिस्टंसी अॅडजस्ट करण्यासाठी आवश्यक असल्यास साधे दूध घाला)
  • बेकिंग पॅनला तेलाने ग्रीस करा. पीठ भुरभुरून ते समान रीतीने टिनमध्ये पसरवा. किवा बटर पेपर (बेकिंगचा) केक टिनच्या मापाचा कापून घ्याआणि पॅन किवा टिनच्या तळाला लावून घ्या.
  • केकचे तयार मिश्रण टिन मध्ये घाला. टिनला हलकेच टॅप करा आणि एका टुथ पीक पिठात फिरवून घ्या परत टॅप करा, जेणे करून पिठ समान रीतीने पसरेल. तसेच जर मिश्रणात हवेचे बुडबुडे असतील तर ते ही निघून जातील आणि केक बेक झाल्यावर वर फुगाही येणार नाही.
  • प्रीहिटेड(आधीच गरम करून घेतलेल्या) ओवन मध्ये 25-28 मिनिटे बेक करावे. टूथ पिक घाला, ते स्वच्छ बाहेर आले पाहिजे. केक टिन काउंटरवर 5 मिनिटे ठेवून द्या.
  • केक फ्लिप करा आणि वायर रॅकवर थंड होऊ द्या. नंतर तो फ्रीज मध्ये ठेवून द्या. थोडा थंड झाला की त्याला क्लिंग रॅप मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवून द्या.
  • पूर्ण थंड झाल्यावर, सेरेटेड चाकू वापरून स्पंज केक व्यवयासतिथ सगळ्या बाजूंनी काळजी पूर्वक कापून त्याचे आडवे दोन ते तीन भाग करून घ्या, अशा प्रकारे आपले स्पंज बनतील. हे स्पंज नंतर चॉकलेट गणाश किंवा व्हीप्ड क्रीम किंवा फळे इ. वापरुन फ्रॉस्ट करून सर्व्ह करा.

Notes

  • केक तयार करताना सर्व घटक सामान्य तापमानवर असावेत.
  • मैदा दोन-तीनदा चाळल्याने अशुद्धता निघून जाते आणि केक स्पॉन्जी बनतो.
  • जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर थोडे साधे दूध घालू शकता.
  • कुठल्याही फळांचे क्रश किवा घट्ट रस वापरत असल्यास ते थोडे कोमट पाणी किंवा साखरेचे पाणी घालून पातळ करा.
Keyword bake, cake, chocolate, chocolate cake, केक, चोकोलेट, चोकोलेट केक