Go Back

हार्ड बॉइलइड अंडी चाट

Sujata Hande-Parab
उकडलेली अंडी हि एक महाराष्ट्रीयन पॉप्युलर डिश आहे. "हार्ड बॉइलइड अंडी चाट" ह्या रेसिपीत मी अंडी 12 ते 15 मिनटे उकडून घेतली आहेत. त्यावर चाट मसाला, तिखट मसाला घालून ती सर्व केली आहेत.
अंडी उकडून ती अशीच किंवा त्यावर थोडी सीजनिंग करून खाल्ली जातात. लहान मुलांचा उकडलेली अंडी हा एक आवडता पदार्थ आहे. ती जर अश्या प्रकारे केली आणि खाऊ घातली तर त्यांना तो फार आवडतील आणि काही तरी वेगळे खाल्याचा आनंद होईल.
Prep Time 5 minutes
Cook Time 20 minutes
Course Appetizer
Cuisine Indian
Servings 4 people

Ingredients
  

  • अंडी
  • १/२ टीस्पून चाट मसाला
  • १/२ टीस्पून लाल मिरची पावडर
  • मीठ एक छोटी चिमूट भर
  • सजावटीसाठी - काप केलेली काकडी, कांदा, लिंबू

Instructions
 

  • एका टोपात पाणी ठेवून अंडी आणि किंचित मीठ घालावे. मध्यम आचेवर उकळी येऊ द्यावी.
  • पाण्याला उकळी आल्यानंतर आच मंद करावी. १२ ते १५ मिनिटे तसेच ठेवावे.
  • नंतर शेगडी बंद करून टोपावर झाकण ठेवून अंडी १५-२० मिनिटे तशीच ठेवावीआणि वाफेवर अंडी शिजू द्यावीत. पाणी गाळून घेऊन थंड पाणी टाकून अंडी सोलून घ्यावीत.
  • दोन भाग करून ताटात घ्यावीत. त्यावर चाट मसाला, लाल तिखट पूड, थोडे मीठ भुरभुरून घ्यावे. हे अंडी गरम असतानाच करावे.
  • काप केलेला कांदा, काकडी, लिंबू बरोबर गरम सर्व्ह करावे. 

Notes

  • लाल मिरची पाऊडर ऐवजी काळी मिरी पूड देखील वापरू शकता.
  • अंडी गरम असतानाच चाट मसाला, लाल तिखट पूड, थोडे मीठ भुरभुरून घ्यावे.
Keyword egg, eggetarian, quick, अंडी, किड्स