Go Back

स्रम्बलेड अंडे

Sujata Hande-Parab
स्रम्बलेडअंडी  (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत: मीठ आणि बटर आणि इतर घटकांसह बनते.
त्यातकाही इतर पदार्थ जसे की चीज, चिवस, हेर्ब्स  इत्यादि या डिश मध्ये घातले जाऊ शकतात. हि एक पटकन होणारी पाककृती आहे. व्हिस्कींग आणि शिजवणे ह्या रेसिपीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात.
प्लफीअफीर  स्रम्बलेड अंडी मिळविण्यासाठी; अंडी जास्त फेटणे आवश्यक आहे. ह्यात अंडे जास्तशिजवूनका ते कठीण आणि तपकिरी होईल. हि डिश होण्यासाठी ३-४ मिनिटे लागतात.
अंडी हा एक सकस आणि पौष्टिक आहार म्हणून आजही प्रचलित आहे. अंड्यात लोह,प्रथिने, विटामीन ए,ड, ब, ईआणि कोलीन हे मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे डॉक्टर देखील अंड्याचा आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला हमखास देतात.
सध्या अंडी खाण्यार्‍याचा एक वेगळा वर्ग तयार झाला आहे. “एग्गेटेरियन” किवा “अंडाहारी” हे लोक जे मासे किवा मास खत नाहीत पण अंडी आवर्जून खातात.
Prep Time 5 minutes
Cook Time 5 minutes
Total Time 10 minutes
Course Breakfast
Cuisine Continental
Servings 2 People

Equipment

  • १ पॅन

Ingredients
  

  • अंडी
  • टेबलस्पून क्रिम - किंवा पूर्ण फॅट युक्त दूध - २ टेबलस्पून
  • १/२ टीस्पून काली मिरी कुटलेली 
  • चवीनुसार मीठ
  • १/२ टेबलस्पून तेल किंवा बटर 
  • सर्व्हिंगसाठी - ब्राउन ब्रेड किंवा पाव

Instructions
 

  • एका वाडग्यात एकत्रितपणे अंडी, मलई किंवा क्रीम, काली मिरी कुटलेली आणि मीठ यांचे मिश्रण एक समान बनत नाही तोपर्यंत फेटून घ्या.
  • नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. फेटलेले अंडी मिश्रण घाला १०-१५ सेकंदांपर्यंत ढवळू नका.
  • नंतर लाकडी चमचा घेऊन तळा खालून उचलून दुमडून परत उचलून-दुमडून व्यवस्तीत मिक्स करून घ्या
  • हे पुनरावृत्ती करा जेणेकरून अंडी हळूहळू सेट होतील. जास्त शिजवू नका. अंडी थोडीसी वाहती क्रीमी राहिली पाहिजेत.
  • गॅस बंद करा. काही सेकंद अंडी पॅन मधेच राहू द्या.
  • गरमा-गरम  ब्राउन पाव किंवा पाव किंवा अगदी पोळी बरोबर देखील सर्व्ह करू शकता.

Notes

  • अंडे जास्त शिजवू नका.
  • एक चांगले स्रम्बलेड अंडे क्रीमि आणि थोडेसे पातळ असले पाहिजे. जास्त कडक शिजवू नये.
  • जास्त प्लफी होण्यासाठी अंडे खूप फेटून घ्या.
Keyword egg, eggetarian, healthy, quick, अंडे