सुकी मेथीची भाजी
Sujata Hande-Parab
मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम चपाती, डाळ भात किंवा रोटी सोबत याची चव अप्रतिम लागते. कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी आणि कडवटपना कमी करण्यासाठी; भाजलेले, ठेचलेले शेंगदाणे घालता येतात.
Prep Time 20 minutes mins
Cook Time 15 minutes mins
Total Time 35 minutes mins
Course Side Dish
Cuisine Indian
- २ कप मेथीची पाने
- १ १/२ कांदा बारीक चिरून - मध्यम कांदे
- ३-४ लसूण पाकळ्या ठेचून
- २-३ हिरवी मिरची चिरून
- २ टेबलस्पून तेल
- मीठ - चवीनुसार
- २ टेबलस्पून किसलेला नारळ किंवा भाजूनठेचलेले शेंगदाणे - २ टेबलस्पून
देठ काढून साफकेलेली मेथीची पाने वाहत्या पाण्याखाली तीनदा धुवा. अतिरिक्त पाणी काढून टाका.
भाजी बारीक चिरून घ्या.
नॉनस्टिक पॅनमध्ये किवा कढईत तेल गरम करा.
ठेचलेला किवा कापलेला लसूण, हिरवी मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत भाजून घ्या.
बारीक चिरलेला कांदा, मीठ घाला. कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
मेथीची पाने घाला. नीट ढवळून घ्यावे आणि ५-६ मिनिटे शिजवून घ्या. झाकण लावू नका अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही. ताजे किसलेले खोबरे घाला. चांगले मिसळा.
चपाती किंवा डाळ-भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.
- मेथी साफ करताना भाजीची नुसती पाने न काढता तिचे देठ जिथपर्यंत कोवळे असतील तिथपर्यंत काढून घ्यावी. जून देठ, मुळे काढून टाकावीत.
- चव वाढवण्यासाठी १/४ चमचा साखर घालता येईल.
- मेथीची पाने साफ करणे ही महत्त्वाचे आहे. माती वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ३ वेळा पाने स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.
Keyword Fenugreek Leaves, gluten-free, healthy, leafy vegetable, इंडियन, पालेभाजी, भाजी