Go Back

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

Sujata Hande-Parab
“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधीलएक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणिकमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती, डाळ भात किंवा रोटी सोबत याची चव अप्रतिम लागते. कोकणात ह्या भाजीत किसलेलेओले खोबरे घालतात.  
Prep Time 20 minutes
Cook Time 10 minutes
Total Time 30 minutes
Course Side Dish
Cuisine Indian
Servings 4 People

Equipment

  • १ कढई

Ingredients
  

  • १२ जुडया किवा २ १/२ कप समुद्रमेथीच्या जुडया धूऊन बारीक कापून घेतलेली
  • २ मध्यम कांदा बारीक चिरून
  • ५-६ लसूण पाकळ्या सोलून, बारीक कापून घेतलेल्या किवा ठेचून घेतलेल्या
  • हिरवी मिरची – २ तिखट  किवा मध्यम तिखट बारीक कापून घेतलेल्या
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • मीठ - चवीनुसार
  • 3 टेबलस्पून किसलेला ओला नारळ - किंवा भाजून ठेचलेले शेंगदाणे - २ टेबलस्पून

Instructions
 

  • जुडया मोकळ्या करून एका मोठ्या पातेल्यात किवा परातीत घेऊन त्यात पाणी घालून त्या ५ ते ८ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवाव्यात.
  • नंतर त्या पाण्यामध्ये दोन्ही हातांचा वापर करून धूऊन घ्याव्यात आणि नंतर त्या पाण्यातून हाताने काढून एका ताटात ठेवाव्यात. पाणी फेकून द्यावे.
  • परत मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्या चांगल्या प्रकारे पाण्यात ढवळून धूऊन घ्याव्यात असे ६-७ वेळा करावे. प्रत्येक वेळेला पाणी टाकून द्यावे.ह्या मेथी मध्ये खूप वाळू असते. त्यामुळे ही मेथी खूप चांगल्या प्रकारे धूऊन घेतली तरच ती वाळू निघते.
  • शेवटी चाळणीत ठेवून व्यवसतिथ निथळत ठेवावी. निथळल्या नंतर ती व्यवसतिथ बारीक कापून घ्यावी.
  • नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा.
  • बारीक चिरलेला कांदा, मीठ घाला. कांदा थोडा गुलाबी-लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • कापलेला लसूण, हिरवी मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत भाजून घ्या.
  • मेथीची पाने घाला. नीट मिक्स करून घ्यावे आणि १० ते १२ मिनिटे कमी आचेवर शिजवून घ्या. ही भाजी लवकर शिजते. भाजी मध्ये-मध्ये ढवळत राहावी.
  • झाकण लावू नका अन्यथा तिचा रंग बदलेलआणि हिरवा रंग राहणार नाही.
  • पाणी आटले आणि भाजी सुकी झाली की ताजे किसलेले खोबरे घाला. चांगले मिसळा.
  • चपाती किंवा डाळ-भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • ही भाजी लवकर शिजते. 
  • भाजी शिजताना झाकण लावून नये अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही. परंतु शिजवताना ती सारखी परतत राहावी जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही. पालेभाजी मध्ये पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे पाणी टाकण्याची किवा झाकण लावण्याची गरज भासत नाही. 
  • ही भाजी खूपदा पाण्यातून धूऊन घ्यावी लागते. वाळू वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ६-७ भाजी स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.प्रत्येक वेळेला मेथी पहिल्यांदा पाण्यातून बाहेर काढून ठेवावी आणि पाणी ओतून टाकावे. नंतर परत सेम पद्धत वापरावी. शेवटी मेथी चाळणीत टाकून निथळत ठेवावी.
Keyword Fenugreek Leaves, quick, पालेभाजी, समुद्री मेथी