सनी साईड अप हा एक फ्राईड अंड्याचा प्रकार असून त्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळीनावे आहेत. हि डिश सगळ्या देशांमध्ये खुपच मोठ्या प्रमाणावर बनवलीजाते. सकाळचा नास्ता म्हणून ब्रेड किंवा पाव आणि सलाड बरोबर ह्याचे सेवन केले जाते.ह्या डिश मध्ये अंडे हे एकाच बाजूने शिजवले जाते. आणि तेही पूर्णनाही. फक्त त्याचा सफेद भाग हा शिजवला जातो आणि योक हे पूर्ण आणि कापल्यावर रनी असलेपाहिजे.