Go Back

शेंगदाण्याचा कूट

Sujata Hande-Parab
“शेंगदाण्याचा कूट” ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि महाराष्ट्रात ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेंगदाणा कूट हा विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये वापरला जातो. हे एक प्रकारचे कोंडीमेंट(condiment) आहे. पदार्थांची चव वाढवण्यासाठी आणि तो पदार्थ अधिक चवदार आणि घट्ट बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो.
Prep Time 20 minutes
Cook Time 10 minutes
Course Condiment
Cuisine Indian
Servings 5 people

Equipment

  • १ तवा किवा कढई

Ingredients
  

  • कप शेंगदाणे

Instructions
 

  • तवा किवा कढई गरम करून कच्चे शेंगदाणे त्यावर टाकावे.
  • गॅसची फ्लेम कमी ठेवून सारखे परतत राहावे.
  • शेंगदाने भाजायला ८ ते १० मिनटे लागतात. ते भाजल्यानंतर त्यावर काळसर असे दाग दिसू लागतात. गॅसबंद करून काही सेकंड ते तसेच तव्यावर ठेवावेत.
  • नंतर एका मोठ्या परातीत किवा खोलगट ताटात काढून घ्यावेत.
  • थंड झाल्यावर एका कपड्याच्या सहायाने किवा हाताच्या तळव्याचा किवा बोटांचा वापर करून ते सोलून घ्यावेत.
  • नंतर ते सुपामध्ये किवा पसरट ताटात घेऊन पाखडून घ्यावेत.
  • सोलून आणि पाखडून झाल्यावर ते मिक्सरला लावून त्याचा जाडसर कूट तयार करून घ्यावा.  दोन पल्स मध्येच कूट तयार होतो. जास्त वेळ मिक्सरला लावून ठेवू नयेत. नाहीतर त्याचे बटर तयार होईल.
  • खलबत्ता वापरुन – खलबत्ता वापरुन केलेला कूट हा थोडा जाडसर असतो. पण ह्यामध्ये केलेल्या शेंगदाणा कूट ज्या भाजीत किवा पदार्थात वापरला जातो त्या पदार्थाची चव उत्तम लागते.
  • हवाबंद डब्यात किवा बरणीत भरून फ्रिज मध्ये ठेवावा. १ ते १ १/२ महिना चांगला राहतो.
    किवा बाहेर ठेवला चारी चालतो पण तो पटकन संपवावा लागतो.
  • लागेल तसा भाजीत किवा भरलेल्या भाज्यांमध्ये किवा साबुदाणा खिचडी मध्ये ह्याचा वापर करावा.

Notes

  • शेंगदाने जास्त वेळ मिक्सरला लावून ठेवू नयेत. नाहीतर त्याचे बटर तयार होईल.
  • खलबत्ता वापरत असताना थोडे तेल सुटते आणि तो लूट थोडा जाडसर असतो.
  • शेंगदाने हे नेहमी चांगल्या प्रतीचे वापरावेत. त्याची चव गोड असते आणि ते ताजे आणि त्यांचा रंग जास्त गडद नसतो. त्यांना कुठे ही दाग नसतात.
Keyword peanut, quick, roasted peanut, शेंगदाने