शिंगाडा पिठाचे थालीपीठ
Sujata Hande-Parab
उपवासाला शिंगाडा हे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. कुठे कुठे ते उकडून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून किवा त्याचे पिठ वापरुन त्यापासूनअतिशय स्वादिष्ट अश्या वेगवेगळ्या रेसिपीज बनविता येऊ शकतात.
Prep Time 10 minutes mins
Cook Time 20 minutes mins
Total Time 30 minutes mins
Course Breakfast, Main Course
Cuisine Indian
- ३/४ कप शिंगाडा पीठ
- १ मध्यम बटाटा उकडलेला आणि किसलेला किंवा मॅश केलेला किवा १/२ वाटी
- मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
- १/४ टीस्पून साखर
- १ टीस्पून लिंबाचा रस
- १ टीस्पून किसलेले आले
- १-२ हिरवी मिरची - जाडसर वाटून घेतलेली
- १/२ टीस्पून भाजलेला जाडसर वाटलेला जिरा
- ३-४ टेबलस्पून भाजलेले आणि जाडसर भरड केलेले शेंगदाणे
- २ टेबलस्पून तेल शॅलो फ्रयिंग
- १/४ कप पाणी पीठ मळण्यासाठी - किंवा गरजेनुसार
- सर्विंग साठी - फ्रेश खोबरे मिरची चटणी किंवाभाजलेल्या शेंगदाण्याची चटणी
सगळ्या वरील सांगितलेल्या वस्तू तेल आणि पाणी सोडून मिक्स करून घ्या.
लागत असेल तरच पाणी घाला आणि पीठ मळून घ्या.
थोडा वेळ ५ मिनिटे झाकून ठेवा. पिठाचे सामान आकाराचे गोळे करून घ्या. पीठ हाताला चिकटत असल्यास थोडे तेल लावून घ्यावे
नॉन स्टिक पॅन गरम करून तेल पसरवून घ्या.
पोळपाटाला प्लास्टिक रॅप किंवा किलिन्ग रॅप लावून घ्या. तेल लावून घेऊनत्यावर थालीपीठ थापून घ्या.
दोन्ही बाजूनी तेल सोडून व्यवस्तिथ भाजून घ्या.
गरमा गरम फ्रेश खोबरे मिरची चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी बरोबर सर्व्ह करा
- पीठ मळताना पाणी लागत असेल तरच वापरा.
Keyword farali, fasting, indian fasting recipes, quick, shingada, water chestnut, फराळी, शिंगाडा, शिंगाडा पीठ