Go Back

वांग्याची सुकी भाजी

Sujata Hande-Parab
वांग्याची सुकी भाजीही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्धअसतात तसाच प्रकारे वांगी ही देखील उपलब्ध असतात.वांग्याचे विविध प्रकार बनवले जातात जसे की वांग्याचे भरित, वांगे-बटाटा रस्सा भाजी किवा सुकी भाजी, भरलेली वांगी, वांग्याची सुकी भाजी किवा कापे. वांगी ही वातूळ असतात त्यामुळे ती नेमानीच खावीत.
Prep Time 15 minutes
Cook Time 15 minutes
Course Main Course, Side Dish
Cuisine Indian
Servings 6 people

Equipment

  • १ कढई/नॉनस्टिक पॅन

Ingredients
  

  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • १/२ टिस्पून जिरे
  • १/२ टिस्पून मोहरीचे दाणे
  • ७/८ पाने कढीपत्ता
  • ४/५ पाकळ्या लसूण सोललेली आणि कापलेली.
  • १ १/२ टिस्पून अद्रक किवा आले किसून किवा ठेचून घेतलेले.
  • १/२ कप कांदा बारीक चिरून.
  • ३/४ कप टोमॅटो बारीक चिरून घेतलेला.
  • १/२ टिस्पून हळद
  • १/४ टिस्पून हिंग
  • १ १/2 टिस्पून लाल मसाला आपल्या आवडी नुसार कमी जास्त करावे.
  • मीट चवी नुसार
  • टेबलस्पून नारळ ताज किसलेला
  • टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली

Instructions
 

  • वांगी देठ काढून, कापून त्याचे बारीक तुकडे करून घ्या आणि एका वडग्यात पाणी आणि मीठ टाकून वागी त्यात ठेवून बाजूला ठेवा. जेणेकरून वांगी काली पडणार नाहीत. किवा वांगी भाजीत घालायच्या अगदी अगोदर कापा.
  • नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. जिरे आणि मोहरी घाला. त्याला तडतडू द्या
  • कढीपत्त्याची पाने आणि कापलेला किवा टेचलेला लसूण, आले घाला. कच्चा वास दूर होईपर्यंत तेलात परतून घ्या.
  • बारीक चिरलेला कांदा घाला आणि पारदर्शक किवा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
  • हळद, हिंग आणि लाल मसाला घालावा. काही सेकंद ढवळा.
  • चिरलेला टोमॅटो आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. वर ताट ठेवून टोमॅटो लगदा होईपर्यंत शिजवून घ्या.
  • ताट काढून कापलेली वांगी त्यात घाला आणि मसाल्यात व्यवस्थित कोट करून घ्या.
  • कापलेली निम्मी कोथिंबीर घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगले मिसळा.
  • खोलगट ताट पॅन किवा कढई वर ठेवून त्यावर पाणी घालून भाजी १० ते १२ मिनिटे शिजवून घ्या. मध्ये मध्ये झाकण हळुवारपने काढून भाजी परतत रहा.
  • जर भाजी जास्त सुकी किवा कढई ललागत असेल तर त्यात ताटा वरचेच गरम पाणी १ ते २ टेबलस्पून घाला.  
  • नंतर ताट काढून भाजीत गरम मसाला आणि किसलेले खोबरे आणि राहिलेली कोथिंबीर घालून परतून घ्या.
  • वांगी अजून शिजलेली नसतील तर त्यावर परत खोलगट ताट ठेवून त्यावर पाणी ठेवून अजून ६ ते ७ मिनिटे भाजी शिजवूनघ्या.
  • गावठी वांगी असतील तर शिजायला कमी वेळ लागतो. वांगी जास्त शिजवून लगदा करू नये नाही तर त्याची चव चांगली लागत नाही.
  • गरम- गरम भाजी चपाती किंवा रोटी किंवा डाळ-भाता बरोबर सर्व्ह करा.

Notes

  • वांगी जुनी नसावीत.
  • कापून झाल्यावर सध्या पाण्यात मीठ घालून त्यात ठेवावीत. नाहीतर काळी पडतात. मीठ नाही वापरले तरी चालते.
  • जास्त अगदी लगदा होईपर्यंत शिजवू नयेत. चव चांगली लागत नाही.
  • वाटण नसेल तर भाजी ही वाफेवर किवा अगदी कमी प्रमाणात गरम पाणी वापरुन शिजवावी.
Keyword brinjal, dry subji, eggplant, indian side dish, इंडियन साइड डिश, भाजी, वांगी, सुक्की भाजी