Go Back

रताळ्याचे वाफवलेले काप

Sujata Hande-Parab
रताळी हेएक कंदमूळ असल्याने त्याचे उपवासात अगदी वरचे स्थान आहे. चवीला गोड आणि थोडे पिठुळअसल्याने कच्चे देखील खाण्यास छान लागते.
सर्वसाधारणलोकांच्या खिशालाही परवडणारे असल्याने घराघरात ह्याच्या विविध पाककृती बनवल्या जातात.
रताळ्यामध्ये प्रथिने, कार्बोदके, तंतुमय पदार्थ आणि अ, ब, क ही जीवनसत्वेआढळतात.
Prep Time 10 minutes
Total Time 25 minutes
Course Breakfast, Snack
Cuisine Indian
Servings 2 people

Equipment

  • 1 मायक्रोवेव किवा स्टीमर / कूकर

Ingredients
  

  • २-३ पूर्ण रताळे
  • १/२ टीस्पून चाट मसाला (ऐच्छिक) (उपवासासाठी असेल तर घालू नये.)
  • ३-४  टेबलस्पून तूप किंवा तेल
  • चवीनुसार मीठ किवा सैंधव मीठ

Instructions
 

  • रताळे नीट घुवून घ्या. ही कंदमुळे किवा मूळभाजी असल्याने बहुतेकदा त्यांना खूप माती असते. दोन्ही बाजूंचीटोके कापून टाका. सोलण्याचीगरज नाही.
  • चाकूच्या मदतीने रताळ्यावर उभ्या चिरा करा.
  • त्यांना बेकिंग ट्रेवर ठेवा. थोडे तेल किंवा तूप टाकून मीठ चोळा.
  • ५ – ७ मिनिटे किंवा मऊहोईपर्यंत मायक्रोवेव्ह करा किंवा १५ ते २० मिनिटेस्टीमरमध्ये वाफ करा. अगदी जास्त लगदा किवा मशी होईपर्यंत शिजवू नका.
  • ओव्हनमधून काढा आणि थंड होऊ द्या.
  • सोलून, काप केलेले रताळ्याचे कप तुपाबरोबर सेर्व करा. किवा तव्यावर किवा पॅन वर तूप टाकून गरम करून सोलून, काप केलेलेरताळ्याचे काप १-२मिनिटे परतून घ्या. वाफवलेली रताळी ही खाताना जास्त ड्राय किवा सुकी लागतात, तुपामुळे त्याला चवही येते आणि खाताना नरम आणि चवदार लागतात.
  • थोडा चाट मसाला शिंपडा, आणि गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • जास्त लगदा होईपर्यंत शिजवू नका नाहीतर रताळ्याची चव कमी होईल
  • मायक्रोवेव्ह मध्ये  शिजवण्याची वेळ रताळ्याच्या आकारानुसार कमी जास्त होऊ शकते.
  • रताळी चांगल्या प्रकारची ताजी असतील तर त्याची चव अप्रतिम लागते.
  • वाफवलेली रताळी ही खाताना जास्त ड्राय किवा सुकी लागतात, तुपामुळे त्याला चवही येते आणि खाताना नरम आणि चवदार लागतात.
Keyword bake, farali, fast, healthy, kids, kids friendly, root vegetable, उपवास, कंदमुळे, बेक, रताळी, स्टीम