Go Back

मिश्र भाज्यांचा रायता

Sujata Hande-Parab
मिश्र भाज्यांचा रायता ह्या रेसिपीमध्ये मीभरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट असे असून, कोणत्याहीमसालेदार व्हेज, नॉनव्हेज डिशसोबत चांगले जाते. चांगल्या चविसाठीनेहमी ताज्या भाज्या आणि दही वापरा.
 
दही खाण्याचे किती फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. दही हे प्रोबायोटिक्स, प्रथिने आणि कॅल्शियमचा प्रमुख स्त्रोत आहे.हाडे मजबूत करण्याव्यतिरिक्ता ते आपल्या शरीराला ही थंड ठेवते. दह्याला स्वतची अशीविशिष्ट चव नसल्यामुळे त्याचा रायता बनवून खाल्ला तर चव आणि पोषण अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतील.
Prep Time 15 minutes
Total Time 15 minutes
Course Salad
Cuisine Indian

Equipment

  • १ फूड प्रोसेसर

Ingredients
  

  • १ मध्यम काकडी (अंदाजे चिरलेली)
  • २ मध्यम टोमॅटो (अंदाजेचिरलेला)
  • १/२ मध्यम बीटरूट (अंदाजे चिरलेला)
  • गाजर (अंदाजे चिरलेला)
  • १/२ मध्यम कांदा
  • टेबलस्पून कोथिंबीर पाने
  • ५ ते ६ पाने पुदिना
  • हिरवी मिरची (तोडून घेतलेली किवा बारीक चिरून घेतलेली)
  • कप दही
  • १/२ टीस्पून साखर किवा पिठी साखर
  • चवीनुसार मीठ

Instructions
 

  • फूड प्रोसेसरमध्ये पहिले सात घटक टाका आणि बारीक करून घ्या. जास्त बारीक करू नका. किवा वरील सगळ्या भाज्या बारीक कापून घ्या.
  • दुसर्‍या भांड्यात दही, मीठ आणि साखर घ्या. चांगले फेटून घ्या.
  • त्यात भाज्या घाला. चांगले मिसळा. ताबडतोब सर्व्ह करा.
  • लगेच सर्व्ह करत नसल्यास, सर्व्ह करण्यासाठी तयार होईपर्यंत थंड करा. तसेच सर्व्ह करताना नंतर दही, मीठ आणि साखरेचे मिश्रण घाला.

Notes

  • लगेच सर्व्ह करत नसल्यास, सर्व्ह करण्यासाठी तयार होईपर्यंत थंड करा.
  • तसेच सर्व्ह करताना नंतर मीठ आणि साखर घाला.
  • भाज्या ताज्या वापराव्यात.
  • दही आंबट नसावे आणि ताजे असावे.
Keyword curd, quick, salad, vegetables, Vegetarian