मस्कमेलन आंबा रायता
Sujata Hande-Parab
सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे. करून झाल्यावर थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवावा.
Prep Time 15 minutes mins
Total Time 15 minutes mins
Course Salad
Cuisine Fusion, Indian
- १ कप खरबूज – बारीक काप केलेले (थोडे कमी पिकलेले)
- २ टेबलस्पून पिकलेला आंबा
- १/२ छोटा कांदा- बारीक कापलेला
- १ छोटा टोमॅटो- बिया आणि आतील लगदा किंवा पल्प काढून बारीक चिरलेला
- १ १/२ टीस्पून कोथिंबीर पाने बारीक चिरलेली
- १ टीस्पून लिंबूरस
- १/४ टीस्पून लिंबू झेस्ट किंवा लिंबाचे किसलेले आवरण
- मीठ चवीपुरतं
- १/४ टीस्पून काळी मिरी
- १/२ टेबलस्पून बारीक कुटलेली रोस्टेड किंवा भाजलेले बदाम आणि काजू
- १/२ टीस्पून एक्सट्रा वर्जिन ऑलीव्ह ऑइल
एका वाडग्यात वरील सगळे पदार्थ एकत्र करून मिक्स करून घ्या.
थोडे एक्सट्रा वर्जिन ऑलीव्ह ऑइल टाकून सर्व्ह करा.
सर्व्ह करतेवेळी मीठ टाका.
- सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे.
- मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे. करून झाल्यावर थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवावे.
Keyword quick, salad, slices, vegetables, सॅलड