Go Back

मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोल

Sujata Hande-Parab
ब्रेड बटर किंवा जॅम ब्रेड हे  मुलांना आवडणारे पदार्थ आहेत. ब्रेड चे तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. मुलांना ही टिफिन मध्ये किवा खाण्यासाठी काही वेगळे हवे असते. ही रेसिपी जॅम-ब्रेडचीच  आहे पण वेगळ्या प्रकारे बनवली आहे.
Prep Time 10 minutes
Total Time 10 minutes
Course Breakfast
Cuisine Indian
Servings 2 People

Ingredients
  

  • ४-६ ब्रेडचे तुकडे
  • १-२ टेबलस्पून बटर
  • ३-४ टेबलस्पून जॅम
  • सर्विंग साठी - सुका मेवा, फळांचे काप, चॉकोलेट सिरप, चेरी

Instructions
 

  • ब्रेडच्या जाड कडा कापून घ्या. लाटण्याचा वापर करून अलगद थोड्या लाटून घ्या.
  • जास्त दाबू नये ब्रेड तुटू शकतो.
  • थोडे बटर व्यवस्तिथ सगळ्या बाजूनी अलगद लावून घ्या.
  • जॅम एका वाडग्यात घेऊन चमच्याने एकदम नरम करून घ्या. तो ब्रेडवर सगळीकडे सामान पसरवून घ्या.
  • एक प्लास्टिक रॅप किंवा क्लिंग रॅप घेऊन त्यावर जॅम लावलेला ब्रेड अलगद उचलून ठेवावा.
  • एका बाजूने रोल थोडा रोल करून घ्यावा.
  • प्लास्टिक रॅप च्या साहाय्याने व्यवस्थित घट्ट रोल करून घेऊन क्लिंग रॅप च्या दोन्ही बाजूनी गाठ मारून रेफ्रिजरेटोर मध्ये १० मिनिटांसाठी ठेवावे.
  • नंतर रॅपर काढून टाकावा आणि ब्रेड रोल चॉकोलेट सिरप, फळे, सुका मेवा ह्याबरोबर सर्व्ह करावे

Notes

  • ब्रेड ताजा असावा नाहीतर रोल होणार नाही. तुकडे पडतील.
  • आपल्या आवडीप्रमाणे जॅम वापरता येईल.
  • फळे फ्रेश असावीत.
Keyword bread, kids, kids friendly, Kids Tiffin, quick, Tiffin