मरीनारा सॉस
Sujata Hande-Parab
मरीनारा सॉस हा टोमॅटो, लसूण, हर्ब्स, तेल वापरून बनवलेला इटालियन सॉस आहे. हा पास्ता, लजानिया, पिझ्झा बनवण्यासाठी वापरला जातो. ह्या सॉस ची चवरीफ्रेशिंग आणि सुगंधित अशी आहे. कोनडीमेंट म्हणून हीह्याचा वापर केला जातो.
Prep Time 10 minutes mins
Cook Time 20 minutes mins
Total Time 30 minutes mins
Course Condiment
Cuisine Italian
- ४ टोमॅटो (लाल आणि पिकलेले)
- १०-१२ लसूण पाकळ्या (मध्यम आकाराच्या)
- चवीनुसार मीठ
- २ टेबलस्पून ऑलिव्ह तेल -
मसाले
- १ टीस्पून लाल मिरची फ्लेक्स
- १ टीस्पून ओरेगॅनो
- १ टीस्पून बेसीलची सुकी पाने -
- १ टीस्पून कुटलेली काळी मिरी
नॉन-स्टिकपॅन मध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करा. सोललेल्या लसूण पाकळ्या घाला. १५ – २० सेकंड परतून घ्या.
चिरलेला टोमॅटो आणि मीठ घाला. टोमॅटो मऊ आणि नरम होईपर्यंत शिजवा. थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर ते मिश्रण मिक्सरला लावून त्याचे बारीक आणि पातळ प्युरी बनवून घ्या. ही प्युरी सूपच्या चाळणीतून चाळून घ्या.
गॅस चालू करून, कमी मंद आचेवर पॅन ठेवून ही गाळून घेतलेली प्युरी पॅनमध्ये घाला आणि मसाले घाला.
जाडसर कनसिसस्टंसी झाल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजर मध्ये ठेवून द्या.
जेव्हा पाहिजे असेल ठेवा साधारण तापमानवर आणून पास्ता, पिझ्झा वैगरे सारख्या रेसिपी मध्ये वापरा.
- टोमॅटो लालसर आणि ताजे असावेत.
- काही ठिकाणी सॉस बनवताना कांदा आणि तेजपत्रीचा वापर ही केला जातो.
- बेसिल ची ताजी पाने जर उपलब्ध असतील तर ती वापरली तरी चालतील.
Keyword Condiment, healthy, quick, spicy, tomato, Vegetarian, टोमॅटो