Go Back

मऊ, मोकळा, खमंग जीरा राइस

Sujata Hande-Parab
भारतात उत्तर भारतात जीरा राइस सर्वाधिक लोकप्रिय आहे आणि मटर पनीर किंवा छोले बरोबर खाल्ले जाते.  लांब, जुना चांगल्या प्रतीचा बासमती तांदूळ, जिरे, तूप आणि काही  खडया मसाल्याचा वापर करून जिरा राइस हा बनवला जातो. काही ठिकाणी रेसिपीवेगवेगळी असू शकते.
Prep Time 25 minutes
Cook Time 20 minutes
Total Time 45 minutes
Course Main Course
Cuisine Indian
Servings 4 people

Equipment

  • १ प्रेशर कूकर

Ingredients
  

  • १ १/४ कप बासमती तांदूळ लांब, जुना चांगल्या प्रतीचा
  • २-३ टेबलस्पून तूप
  • १ १/४ टीस्पून शाही जीरा
  • २-३ हिरवी वेलची
  • १/२ इंच दालचिनी स्टिक
  • ४-५ लवंगा
  • चक्रफुल
  • तेजपत्ता किंवा तमालपत्र
  • १-२ हिरवी मिरची उभ्या चिरून
  • १ १/२ टीस्पून लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून सजावटीसाठी
  • ३ १/२  - ४ कप पाणी

Instructions
 

  • तांदूळ धूऊन पाणी पूर्णपणे काढून टाका आणि बासमती तांदूळ २० मिनिटे भिजवा.
  • प्रेशर कुकरमध्ये तूप गरम करा. सर्व अख्खे मसाले, शाही जिरा घाला. त्यांना स्प्लटर आणि सिझल होऊ द्या.
  • चिरलेली हिरवी मिरची घाला. चांगली परतून घ्या.
  • भिजवलेला व निथळलेला बासमती तांदूळ घाला. हलक्या हाताने मिसळा. १०-१२ सेकंद परतावे. पाणी, लिंबाचा रस, मीठ घाला. चांगले मिसळा.
  • झाकण झाकून तांदूळ मध्यम-मोठ्या आचेवर ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
  • प्रेशर कुकर उघडण्यापूर्वी थंड होऊ द्या. १-२ मिनिटे जसे आहेतसे ठेवा. काटा चमचा वापरुन तांदूळ मोकळा करून घ्या. मोठा चमचा किवा पलिता वापरू नका नाहीतर भाताचे तुकडे होतील.
  • कोथिंबीरीने सजवा. छोले किंवा कोणत्याही मसालेदार करीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • भात शिजल्यावर लगेचच ढवळू नये. थोडा थंड होऊ द्यावा आणि काटा चमचा वापरुन मोकळा करावा.
  • भात २ किवा ३ शिट्याच शिजवावा जास्त शिजला तर तो चिकट होतो.
Keyword Indian Rice, Jira rice, quick, Rice, Vegetarian, इंडियन, भात, राइस