Go Back

भेंडीची भाजी

Sujata Hande-Parab
“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला, भरलेली भेंडी, दही भेंडी असे अनेक प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जातात.
महाराष्ट्रात भेंडीची भाजी ही कांदा, लसूण, मिरची, कोकम आणि ओले खोबरे किवा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरुन केली जाते.
Course Side Dish
Cuisine Indian
Servings 4 People

Equipment

  • १ पसरट कढई किवा पॅन

Ingredients
  

  • 250 ग्राम्स भेंडी धूऊन, पुसून, बारीक स्लाईसेस मध्ये कापून घेतलेली
  • 2 मध्यम कांदे बारीक कापून घेतलेले
  • 2 - 3 मिरची – तिखट बारीक चिरून किवा उभी मध्ये कापून दोन तुकडे करून घेतलेली.
  • ३-४ लसूण पाकळ्या सोलून, बारीक कापून किवा ठेचून घेतलेल्या
  • 3 ते 4 तुकडे कोकम
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • मीठ - चवीनुसार
  • टेबलस्पून किसलेला ओला नारळ - २ टेबलस्पून

Instructions
 

  • भेंडी धूऊन घ्या. पाणी निथळल्या नंतर भेंडी कपड्याने चांगली पुसून कोरडी करा.
  • भेंडीचे देठ कापून टाका आणि भेंडी गोल स्लाईसेस मध्ये कापून घ्या
  • पसरट कढईत तेल गरम झाले की कापलेली भेंडी आणि कोकम टाकून मध्यम आचेवर ती ८ ते १० मिनिटे तेलात थोडी नरम आणि बाहेरचे आवरण थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.
  • ती काढून एका ताटलीत ठेवा. त्याच कढईत तेल टाकून चिरलेला कांदा, लसूण आणि मिरची टाकून कांदा लालसर होईपर्यंत१ ते २ मिनटे भाजून घ्या.
  • ह्यात मीठ टाकून परत परून घ्या.
  • आता आधीच भाजलेली भेंडी टाकून मिक्स करून घ्या. ३ ते ४ मिनिटे शिजू द्या. शिजताना हलक्या हाताने पलिता वापरुन परतत रहा. किवा टॉस करा.
  • नंतर ओले खोबरे टाकून भाजी परतून गॅस बंद करा.
  • गरमा-गरम भाजी, चपाती किवा डाळ-भात ह्या बरोबर सर्व करा.

Notes

  • भेंडी कोवळी असावीत.
  • धूऊन, चांगली पुसून घ्यावीत. पाणी ठेवू नये.
  • भेंडी मध्यम आचेवर परतून घेताना थोडी शिजली की फ्लेम बंद करावी. कारण नंतर ती परत शिजवली जाते. भेंडी जास्त शिजवू नयेत.
  • कोवळी भेंडी लवकर शिजतात.
  • भाजताना कुठेही झाकण ठेवू नये
Keyword Lady's fingers, Maharashtrian cuisine, Okra, quick, भाजी, भेंडी, सुक्की भाजी