Go Back

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

Sujata Hande-Parab
पेस्टो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइननट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयारकेला जातो. बेसिल पाने, लसूण, मीठ, पार्मझाण चीज किंवा पेकोरिनो सार्डो (मेंढीच्या दुधापासून बनवलेले चीज) ऑलिव्हऑईल वापरून मिश्रित केले जाते. पेस्टोचा वापर अनेक व्हेज, नॉनव्हेज डिशेसमध्ये केला जातो.
Prep Time 10 minutes
Cook Time 5 minutes
Total Time 15 minutes
Course Condiment, Sauce
Cuisine Italian
Servings 4 People

Equipment

  • १ मिक्सर

Ingredients
  

  • १०० ग्रॅम बेसिल ताजी पाने
  • ३ १/२ टेबलस्पून भाजलेले बदाम
  • १/२ टीस्पून ब्लॅक पेपर किवा काळीमिरी
  • लसूण पाकळ्या
  • टेबलस्पून किसलेले पार्मझाण चीज
  • १/२ कप ऑलिव्ह तेल
  • १/२ लिंबू लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ

Instructions
 

  • भाजलेले बदाम आणि काळीमिरी एकत्र बारीक वाटून घ्या.
  • ताजी बेसिल पाने, लसूणपाकळ्या, मीठ, अर्धेतेल आणि किसलेले पार्मझाण चीज घाला. मिश्रण चांगले एकत्र येऊन मिसळेपर्यंत ब्लेण्डकरा.
  • मिश्रण थोडे जाडसरच ठेवा. सगळ्या बाजू स्क्रॅप करून मिश्रण एकत्र करून घ्या. उर्वरित ऑलिव्ह तेल घाला. पुन्हा मिक्सर ल लावून घ्या.
  • आवश्यकतेनुसार पास्ताकिंवा पेस्टो चिकन/पनीर इत्यादीसाठी वापरा.
  • हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रीजरमध्ये ठेवा.  

Notes

  • लिंबाचा रस पेस्तो किंवा चटण्यांमध्ये रंग आणि चव टिकवून ठेवण्यास मदत करतो.
  • पार्मझाण चीज नॉनव्हेज प्रकारातही येते. व्हेज, नॉनव्हेज पर्याय तपासण्याची गरज आहे.
  • पेस्तो सॉस फ्रीजर मध्ये हवाबंद डब्यात 2-3 आठवड्यांपर्यंत चांगला राहतो.
  • इंडियन बेसिल आणि इटालियन बेसिल यामध्ये खूप फरक आहे. पेस्तो साठी इटालियन बेसिल वापरले जाते
Keyword Condiment, quick, Sauce, ग्लुटेन-फ्री