बेगून भाजा (वांग्याची कापे – बंगाली पद्धतीने)
Sujata Hande-Parab
बेगुन हा बंगाली शब्द आहे, म्हणजेच तळलेले, कुरकुरीत किवा शालोफ्राय केलेले. बेगून भाजा हीएक पारंपरिक बंगाली डिश आहे. वांगी किंवा ब्रिंजल हे ह्या रेसिपीचा बेस आहे. फ्राय/शालोफ्राय करताना ह्यात राईच्या तेलाचा वापर केला जातो.
Prep Time 30 minutes mins
Cook Time 10 minutes mins
Total Time 40 minutes mins
Course Appetizer, Side Dish
Cuisine Indian
- १ मोठे वांगी गोल कापलेली, शक्यतो १/२ इंच
- १/२ कप तांदळाचे पीठ
- १ १/२ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून गरम मसाला
- १/२ टीस्पून हळद
- १ टीस्पून लिंबाचा रस
- २-३ टेबलस्पून तेल / मोहरीचे तेल शालो फ्राय करण्यासाठी
- चवीनुसार मीठ + १/२ टीस्पून वांग्याच्या तुकड्यांना लावण्यासाठी
- पाणी - मसाला पेस्टकरण्यासाठी १/२ -१ टेबलस्पून –वांग्याची कापे भिजवून ठेवण्यासाठी २ कप.
एग्प्लान्ट किंवा वांगी धुवा, त्याचेगोलाकार तुकडे करा.
एका मोठ्या भांड्यात २ कप पाणी घ्या, मीठ घाला आणि स्लाइस स्थानांतरित करा. १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा.
एका भांड्यात मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद, लिंबाचा रस घ्या. थोडे पाणी घालावे. जाडसर पेस्ट बनवा.
मीठाच्या पाण्यातून काप काढा. त्यांना एका मलमलच्या कपड्याने थोडसे पुसून घ्या. तयार मसाला पेस्टने चांगले कोट करा. १० मिनिटे बाजूला ठेवा.
तांदळाचे पीठ एकाप्लेट मध्ये पसरवा. वांग्याचे तुकडे पिठात एकावेळी एक करून व्यवसतिथ सगळ्या बाजूंनी कोट करून घ्या. बाजूला ठेवा.
नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. समान रीतीने पसरवा. तेलात तांदळाच्या पिठातील काप हलक्या हाताने ठेवा. पॅनमध्ये एकावेळी जास्त कापे टाकू नका.
दोन्ही बाजूंनी हलके तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळा.
टिशू पेपर (कीचेन टॉवेल) वर काढा.
कोणत्याही सॉस किंवा डाळ-भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.
- वांगी कापून लगेचच मिठाच्या पाण्यात ठेवावीत, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत.
- वांगी शक्यतो जांभळ्या रंगाची, मोठी वापरावीत.
- पारंपरिक रेसिपी मध्ये राईचे तेल वापरले जाते. आपल्या आवडीप्रमाणे आणि उपलब्धीप्रमाणे कुठलेही तेल वापरले तरी चालते.
- ही डिश गरमागरम आणि लगेचच सर्व केली तरच खूप अप्रतिम लागते.
Keyword Fry, quick, Shallow Fry, Vegetarian, फ्राय