Go Back

बीटरूट खमंग पुरी

Sujata Hande-Parab
या कृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेली जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी गरम चहा सह खूपच स्वादिष्ट लागते.  अतिशय हेलथी आणि पौष्टिक डिश सगळ्यांनी आवर्जून करावी.
Prep Time 15 minutes
Cook Time 10 minutes
15 minutes
Total Time 40 minutes
Course Main Course
Cuisine Fusion, Indian
Servings 4 People

Equipment

  • १ कढई

Ingredients
  

  • १ १/२ कप गहू पीठ
  • १/२ - ३/४ कप घट्ट बीट रूट रस किंवा प्युरी
  • १/२ टेबलस्पून जिरा - (जाडसर वाटून घेतलेला)
  • टेबलस्पून जाड दही
  • चवीनुसार मीठ
  • १ टेबलस्पून + २ कप तेल -  पीठ मळण्यासाठी + तळण्यासाठी
  • २-३ टेबलस्पून पाणी-  किंवा घट्ट पीठ मळण्यासाठी जर लागत असेल तरच वापरने.

Instructions
 

  • बीट रूट धुऊन, बारीक तुकडे करून मिक्सर ला प्युरी किंवा वाटून घेणे. चाळणीने गाळून घेणे.
  • एका पातेल्यात गव्हाचे पीठ, मीठ, तेल, वाटलेलेजिरा, दही, आणि बीटरूट प्युरी घ्या. चांगले मिक्स करावे
  • जर लागत असेल तरच थोडे थोडे पाणी हळूहळू टाकावेआणि पीठ कडक किंवा घट्ट मळून घ्यावे.
  • झाकण ठेवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे.
  • एका कढाईत तेल गरम करावे.
  • कणिकचे थोडे भाग घ्या आणि गोळे करा.
  • थोडे तेल पोळपाटाला लावून घ्यावे.
  • एक गोळा ठेवा, थोडे तेल लावून,सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. पुरीथोडी जाड असावी.
  • मध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउनहोईपर्यंत आणि  फुगेपर्यंत फ्राय करा.
  • बटाटा भाजी किंवा चण्याच्या भाजी किंवा चहा बरोबर गरम सर्व्ह करा.

Notes

  • पुरी साठी पीठ घट्ट मळावे.
  • पुरी लाटताना तेलाचा वापर करावा. 
  • पुरी तळताना एक किवा दोन पुर्‍या टाकून तळावे.
Keyword beetroot, fried puri, fusion, indian bread, quick, root vegetable, Vegetarian