फोडशीच्या पानांची भजी
Sujata Hande-Parab
फोडशी किंवा कुलू ची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. मी हि भाजी, कांदा, बेसन आणि काही मसाले वापरून भजी बनवलेली आहे. फोडशी ची भाजी आणल्यानंतर तिच्या पाती वेगळ्या करून घ्याव्यात. मध्ये सफेद जाड दांडी असेल तर ती हि काढावी. व्यवस्तिथ पाण्यात ३-४ वेळा धुवून काढावी आणि नंतरच तिचा वापर करावा
Prep Time 30 minutes mins
Cook Time 15 minutes mins
Total Time 45 minutes mins
Course Appetizer, Side Dish, Snack
Cuisine Fusion, Indian
- १ १/२ कप फोडशीची पाने – चांगली धूऊन बारीक कापलेली
- १/२ -३/४ कप बेसन
- १ मध्यम कांदा – उभा पातळ चिरून घेतलेला
- १ हिरवी मिरची तिखट, लांब - बारीक कापून
- १ टीस्पून गरम मसाला
- १/४ टीस्पून हिंग
- १/२ टीस्पून जिरे
- २ कप तेल तळण्यासाठी
- मीठ चवीनुसार
फोडशीची पाने आणि कांदा एका वाडग्यात घेऊन मीठ टाकावे. चांगले चुरून घेऊन झाकण करून १५-२० मिनिटांसाठी बाजूला ठेवावे. ह्याने भजीच्या मिश्रणाला पाणी सुटते. वेगळे पाणी टाकायची गरज लागत नाही.
त्यात गरम मसाला, हिंग, लाल तिखट, जिरे टाकून व्यवस्तीत एकत्र करावे.
हळू-हळू बेसन टाकून एकजीव करून घ्यावे. जर बेसन आणखीन लागत असेल तर टाकावे. ५ मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवावे. नंतर परत मिक्स करावे.
एका कढईत तेल तापवावे. आंच कमी मध्यम ठेवावी. हळू हळू भजीचे मिश्रण थोडे थोडे करून तेलात सोडावे. तेल खूप गरम नसावे. नाही तर भजी आतून कच्च्या आणि बाहेरून करपतील.
सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत कमी - मध्यम ज्योती वर तळून घ्या.
गरमा गरम टोमॅटो सौस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
- व्यवस्तिथ पाण्यात ३-४ वेळा धुवून काढावी आणि नंतरच तिचा वापर करावा. नाहीतर खाताना माती लागण्याचा शक्यता असते.
- भजी कापल्यानंतर, मीठ घालून व्यवसतिथ चुरुन घेतल्याने आणखीन पाणी टाकण्याची गरज लागत नाही.
- मंद आचेवर तळावी. नाही तर भजी आतून कच्च्या आणि बाहेरून करपतील.
Keyword bhaji, bhajiya, Fodashi, leafy vegetable, pakoda, Pakora,, quick, पालेभाजी, फोडशी पालेभाजी, भजी