Go Back

फोडणीचा भात (पिवळा)

Sujata Hande-Parab
“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे.
फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला जात असे. लहान मुलांच्या डब्यात ही हा भात बर्‍याचदा बघायला मिळत असे.
Prep Time 10 minutes
Cook Time 15 minutes
Total Time 25 minutes
Course Breakfast, Main Course
Cuisine Indian
Servings 4 People

Equipment

  • १ कढई

Ingredients
  

  • कप रात्रीचा उरलेला भात
  • १/२ टिस्पून हळद
  • १/४ टिस्पून हिंग पाऊडर
  • १/२ टिस्पून राई
  • १/२ टिस्पून जिरे
  • ५ ते ६ कडीपत्ता
  • १ मोठा / (१/३ कप) कांदा
  • ४ पाकळ्या लसूण सोलून ठेचलेली किवा कापून घेतलेली
  • ३ मध्यम तिखट मिरची बारीक कापून घेतलेली
  • टेबलस्पून कोथिंबीर बारीक कापून घेतलेली
  • मीठ चवीनुसार
  • टेबलस्पून तेल फोडणीसाठी

Instructions
 

  • एका खोलगट भांड्यात किवा वाडग्यात रात्रीचा उरलेला भात घ्यावा. त्यात हळद आणि मीठ घालून तो व्यवसतिथ एकत्र करून घ्यावा.
  • भाताच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्याव्यात आणि तो मोकळा करावा.
  • एका कढईत किवा पॅनमध्ये तेल घालावे.
  • ते गरम झाले की त्यात राई आणि जिरे घालून त्याला तडतडू द्यावे.
  • त्यानंतर त्यात कडीपत्ता, कापलेली मिरची आणि लसूण घालून ५ ते ६ सेकंद परतून घ्यावे.
  • कापलेला कांदा घालून तो पारदर्शक, थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा
  • त्यांत हळद-मीठ लावलेला भात टाकून तो मस्त एकत्र करून घ्यावा.
  • त्यावर झाकण ठेवून १ ते २ मिनिटांसाठी तसाच ठेवावा.नंतर झाकण काढून त्यावर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून गरमा-गरम सर्व करावा.
  • हा भात असाच मस्त लागतो पण लोणचे आणि लाल चटणी बरोबर असली तर अगदी अप्रतिम लागतो.

Notes

  • भात जास्त चिकट नसावा.
  • हा भात लाल मसाला घालून ही करता येतो.
  • मिरची आपल्या आवडी नुसार कमी-जास्त करता येते.
  • हा भात गरम-गरम मस्त लागतो.
Keyword fried rice, Indian Rice, quick, फोडणीचा भात