Go Back

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

Sujata Hande-Parab
या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात आणि कोणत्याही करी किंवा अगदी गरमचहासोबतही छान लागतात.
Prep Time 30 minutes
Cook Time 15 minutes
Total Time 45 minutes
Course Breakfast, Main Course
Cuisine Indian
Servings 4 People

Ingredients
  

  • १ १/२ कप गव्हाचे पीठ
  • ३/४-१ कप फुलकोबी प्युरी
  • १/२ टीस्पून कुस्करलेला जीरा
  • १/२ टीस्पून जाडसर वाटलेला ओवा
  • टेबलस्पून हिरवी मिरची जाडसर वाटून घेतलेली
  • टेबलस्पून घट्ट दही
  • चवीनुसार मीठ
  • १ टेबलस्पून+ २ कप तेल - पोळपाटाला लावण्यासाठी + तळण्यासाठी
  • गरज असेल तरच पाणी.

Instructions
 

  • फुलकोबीच्या पाकळ्या काढून धूऊन, ब्लांच करून घ्या. आणि आणि मिक्सरला लावून त्याची प्यूरी बनवून घ्या. त्यात तोडून मिरच्या ही घाला किवा त्या वेगळ्या वाटून घ्या.
  • एका भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ, तेल, ठेचलेले जिरे, ओवा, बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची, दही घ्या. चांगले मिसळून घ्या.
  • हळूहळू फुलकोबीची प्युरी घाला आणि घट्ट पीठ मळून घ्या. झाकण ठेवून २०-३० मिनिटे बाजूला ठेवा.
  • कढईत तेल गरम करा. पिठाचा छोटासा भाग घेऊन त्याचा गोळा बनवा.
  • पोळपाट थोड्या तेलाने ग्रीस करा. एक गोळा ठेवा आणि सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा किवा लाटून घ्या. पुरी थोडी जाडसर असावी.
  • एका कढईत तेल गरम करून घ्या
  • लाटून ठेवलेल्या पुर्‍या एक किवा दोन करून तेलात सोडा.
  • पुरी मध्यम मंद आचेवर सर्व बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
  • बटाटा करी किंवा भाजी किंवा छोले सोबत गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • पुरी साठी पीठ नेहमी घट्ट असावे. पुरी लाटण्यासाठी तेल वापरा.
  • आवश्यक असल्यासच पीठ मळताना त्यात पाणी घाला.
  • फुलकोबीच्या पाकळ्याची एकदम बारीक पेस्ट किवा प्युरी करून घ्यावी. जाड असल्यास पुर्‍या फुलणार नाहीत.
Keyword cauliflower, fried puri, indian bread, kids friendly, quick, Vegetarian