“फराळी ओल्या खोबर्याची चटणी” ही गरमा-गरम साबुदाणा वडा किवा कुठल्याही उपवासाच्या पदार्थबरोबर चवदार लागते. लिंबाच्या रसामुळे तर त्याला एक प्रकारची फ्रेश चव येते आणि चटणीचा रंग ही ताजा राहतो. उपवास म्हटले की कुठलाही पदार्थ बनवताना खूप विचार करून बनवावे लागतात. मग तो साबुदाणा वडा असो किवा त्याबरोबर लागणारी चटणी असो. पदार्थ वापरताना सगळेच पदार्थ उपवासला चालत नाहीत त्यामुळे काही मोजकेच पदार्थ वापरुन मी ही चटणी केलेलीआहे.
सर्व साहित्य एकत्र करून, मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून करा.
कंसिस्टंसी आपल्याला हवी असेल तशी करा. घट्ट हवी असेल तर थोड्याचपाण्याचा वापर करा. पातळ हवी असेल तर साधे पाणी घाला आणि पुन्हा थोडावेळ मिक्सरला फिरवून घ्या. वाटीत काढून घ्या.
तडक्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून जिरे टाकून तडताडूद्या. हा तडका चटणीमध्ये घालून. चटणी ढवळून घ्या. सर्व्ह करा.
उरली असेल तर हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रिजर मध्ये ठेवा. ३ ते ४ दिवस चांगली राहते
Notes
चांगल्या चविसाठी ताजाच नारळ वापरा.
कच्चा आंबा उपलब्ध असेल तर तो सोलून वापरता येतो.
कंसिस्टंसी आपल्याला हवी असेल तशी करा. घट्ट हवी असेल तर थोड्याच पाण्याचा वापर करा पातळ हवी असेल तर साधे पाणी घाला.
हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रिजर मध्ये ठेवा. ३ ते ४ दिवस चांगली राहते.