Go Back

फणसाचे अप्पे

Sujata Hande-Parab
फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे  हे कडक आणि कमी रसवाले किंवा अगदी बेताने रसाळ असतात. कापे गरे  टिकाऊ आणि जास्त प्रमाणात खाल्ले जातात. बरके हे रस, फणस पापड, सांदण, इडली, शिरा ह्यामध्ये वापरले जातात.
Prep Time 30 minutes
Cook Time 15 minutes
Total Time 45 minutes
Course Breakfast
Cuisine Indian
Servings 4 People

Equipment

  • १ अप्पे पॅन

Ingredients
  

  • ३/४ कप फणस लगदा किंवा पल्प (बरक्या फणसाचे गरे, बी कडून घेतलेले आणि मिक्सर ला लावूनवाटून घेतलेले)
  • २-३ टेबलस्पून तांदूळ पीठ किंवा गव्हाचे पीठ
  • कप रवा
  • १/२ – ३/४ कप किसलेला गुळ आपल्या चवीनुसार कमी जास्त करावे.
  • १/२ टीस्पून वेलची पूड  
  • १/४ टीस्पून जायफळ पूड जास्त टाकू नये.
  • १-२ टेबलस्पून काजू तुकडे
  • १/४ टीस्पून बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा
  • मीठ- छोटी चिमूटभर
  • १ टेबलस्पून + ३-४ टेबलस्पून तूप- बॅटर साठी + अप्पे भाजण्यासाठी
  • २-३ टेबलस्पून पाणी

Instructions
 

  • रवा चांगला धुऊन गाळून घ्यावा.चाळणीत निथळत १०-१५ मिनिटे तसाच ठेवावा.
  • एका वाडग्यात फणस पल्प किंवा लगदा, रवा, गूळ, वेलची, मीठ आणि जायफळ पूड एकत्र करून घ्यावे.
  • गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ, तूप टाकून व्यवस्तिथ मिक्स करून घ्यावे. जर लागत असेल तर थोडे पाणी घालावे. मिक्स करावे.
  • अप्पे पॅन वर तूप टाकून गरम करून घ्यावे. केलेले मिश्रण छोट्या गोल चमच्याने ३/४ टाकून घ्यावे.मंद आचेवर एका बाजूने भाजून घ्यावे. कडा ब्राउन होऊ लागल्यावर परतून घ्यावे.
  • तूप सोडून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यावे.
  • गरमा-गरम चहा बरोबर सर्व्ह करा.

Notes

  • फणस मध्ये बरका फणस वापरावा. बरके गरे रसाळ असल्याकारणाने अप्पे बनिवण्यासाठी ते जास्त वापरले जातात.
  • गुळा ऐवजी साखर वापरली तरी चालते. गुळाचे प्रमाण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करावे.
  • अप्पे मंद आचेवर भाजावेत अन्यथा करपू शकतात.
  • जाड अप्पे पात्र वापरले तर डिश उत्तम बनेल.
Keyword jackfruit, quick, sweet, अप्पे, फणस, स्वीट