Go Back

पौष्टिक गाजर फलाफल

Sujata Hande-Parab
फलाफल हाएक तळलेला चपटी पॅटी किवा गोल बॉल आकाराचा बनतो जो चणे किवा फवा बीन्स किंवा दोन्हीपासून बनविला जातो. फलाफल हेमध्यपूर्वेतील एक पारंपारिक स्ट्रीट फूड आहे जे पिटा पॉकेटमध्ये किंवाफ्लॅटब्रेडमध्ये गुंडाळले जाते ज्याला टॅबून म्हणतात. ते व्हेज सॅलड्स, ताहिनी सॉससह सर्व केले जाते.
ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे पौष्टिकमूल्य वाढवते. ही एक फ्युजन रेसिपी आहे.
Prep Time 15 minutes
Cook Time 15 minutes
10 minutes
Total Time 40 minutes
Course Appetizer, Side Dish, Snack
Cuisine Middle Eastern
Servings 4 People

Ingredients
  

  • १/२ कप काबुलीचणे (रात्रभर भिजवलेले)
  • १/४ कप घट्ट दाबून घेतलेले किसलेले आणि पिळून काढलेले गाजर
  • लसूण पाकळ्या
  • टीस्पून वाटलेली काळी मिरी - १
  • १/२ टीस्पून बारीक कुटलेले जिरे
  • १/२ टीस्पून बारीक कुटलेले धने
  • १/२ कांदा छोटा बारीक चिरलेला
  • १ मूठभर. किंवा १/४ कप + २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/२ टेबलस्पून कॉर्न स्टार्च
  • १/४ टीस्पून बेकिंग सोडा
  • चवीनुसार मीठ
  • टेबलस्पून पांढरे तीळ - रोलिंगसाठी
  • कप तेल तळण्यासाठी

Instructions
 

  • वरील सर्व पदार्थ, खाण्याचा सोडा सोडून; मिक्सरला जाडसर वाटून घ्यावेत.   एका वाडग्यात काढून घ्या. झाकण लावून १५ मिनिटे रेफ्रिजरेट करा.
  • १५ मिनिटांनी मिश्रण बाहेर काढून त्यात बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करावे
  • त्याचे ९-१० समान भाग करा आणि लहान टिक्की किंवा कटलेट बनवा
  • पांढऱ्या तीळात लाटून घ्या.
  • पॅन मध्ये किंवा कढईत तेल गरम करा. फलाफेल्स मंद मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
  • बीटरूट हमोस किंवा कोणत्याही डिपसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • सोडा वापरताना तो मिश्रण फ्रीज मधून काढल्यावरच वापरावा. सोडा वापरला तर फलाफल हे मस्त फ्लफी, नरम होतात नाहीतर ते सुके सुके कडक लागतात.
  • फलाफल साठी काबुली चणे हे रात्रभर पाण्यात भिजवून घेतले जातात. शिजलेले चणे ह्या रेसिपी मध्ये वापरत नाहीत.
  • एकदम बारीक पेस्ट केली जात नाही.
Keyword Fry, fusion, healthy, patti, quick, Shallow Fry, फलाफल, फ्राय