पॅन सीअर्ड मसाला अंडी
Sujata Hande-Parab
पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश बहुतेक घरात प्रामुख्याने बनवली जाते. अतिशय पटकन होणारी आणि खूपच कमी पदार्थ वापरून केली जाते. घाईच्या वेळेला अनेकदा काही दुसरा पर्याय नसेल तर केली जाते. चपाती, डाळभात किंवा ब्रेड पाव बरोबर अतिशय स्वादिष्ट लागते. अंड्यांचा सफेद भाग कुरकुरीत झाल्यामुळे एक वेगळीच चव ह्या डिशला येते.
Prep Time 5 minutes mins
Cook Time 15 minutes mins
Total Time 20 minutes mins
Course Breakfast, Side Dish
Cuisine Indian
- ३-४ अंडी - (उकडून घेतलेली)
- १ मोठा कांदा - बारीक चिरून घेतलेला
- १/२ टीस्पून हळद
- १/२ टीस्पून गरम मसाला
- १/२-१ टीस्पून लाल मिरची पावडर
- मीठ एक छोटी चिमूट भर
- १ टेबलस्पून तेल
- १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर पाने
- सर्विंग साठी - ब्राउन पाव
एका पॅन मध्ये तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून तो थोडा लाल होईपर्यंत भाजून घ्यावा. जास्त काळा करू नये.
त्यात लाल मिर्ची पूड, गरम मसाला, मीठ, हळद घालून थोडे परतून घ्यावे.
उकडलेली अंडी दोन सामान भागामध्ये कापून मसाल्यात अलगद ठेवावी.कांदा मसाला व्यवस्तीत त्यावर पसरून घ्यावा. २ मिनिटे तशीच ठेवावी. आच मंद मध्यम असावी.
अलगद पालटून दुसया बाजूने देखील १-२ मिनिटे भाजून घ्यावीत. अंडी दोन्ही बाजूनी थोडी क्रिस्पि झाल्यावर शेगडी बंद करावी.
गरमा-गरम चपाती किंवा डाळभात बरोबर किंवा पावाबरोबर सर्व्ह करावी.
Keyword egg, eggetarian, quick, अंडी