Go Back

पालक फ्रिटाटा

Sujata Hande-Parab
फ्रिटाटा  हि एक इटालियन डिश असून ती बहुतांशी ऑम्लेट सारखी असते. अंडी फेटून किंवा भाज्यांमध्ये अर्धवट शिजवून फ्रिटाटा  बेक केला जातो किंवा पॅनवर बनवला जातो.
Prep Time 5 minutes
Cook Time 10 minutes
Total Time 15 minutes
Course Breakfast
Cuisine Italian
Servings 2 People

Equipment

  • 1 पॅन

Ingredients
  

  • ३/४ - १ कप पालक पाने बारीक चिरलेली
  • १/४ कप लाल शिमला मिरची
  • १/२ कांदा मध्यम उभा चिरून घेतलेला
  • टीस्पून लाल मिरची फ्लेक्स
  • ३-४ टेबलस्पून किसलेले चीज 
  • टेबलस्पून दूध
  • १-२ टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
  • सजावटीसाठी-  पालकाची पाने - २-३, सिमला मिरची लाल कांदा,चीज किसलेले

Instructions
 

  • एका वाडग्यात अंडी, लाल मिरची फ्लेक्स, दूध, किसलेले चीज, आणि एक छोटीचिमूट मीठ  टाकावे. चांगले फेटून घ्यावे. बाजूलाठेवावे. मीठ कमीच टाकावे. चीज मध्ये आधीच मीठ असते.
  • एका पॅन मध्ये तेल टाकून गरम करून घ्यावे. त्यात उभा चिरलेला कांदा टाकून १/२ मिनिट परतून घ्यावा. कापलेली सिमला मिरची टाकावी . १/२ मिनिटे परतून घ्यावी.जास्त भाजू नये.
  • चिरलेला पालक टाकावा. एक छोटी चिमुट मीठ शिंपडावे. थोडे परतून घ्यावे.मिश्रण तव्यावर चांगले पसरवून घ्यावे. 
  • बनवलेले अंड्याचे मिश्रण गोलाकार टाकावे. १/२ मिनिट ठेवून बाजू थोड्या वेगळ्या करून घ्याव्या.  झाकण ठेवावे. गॅस मंद ठेवावा.
  • झाकण काडून वरची बाजू थोडी कडक झाली असल्यास आम्लेट किंवा फ्रिटाटा एका प्लेटवर उलटा करून घ्यावा.
  • थोडे तेल स्प्रिंकल करून परत हळू दुसऱ्या बाजूने पॅनवर १/२ मिनिट ठेवावा.
  • प्लेटवर काढून सर्व्हे करावा

Notes

  • नेहमी मंद माध्यम आचेवर शिजवा.
  • आपल्या आवडीच्या भाज्या टाकू शकतात.
Keyword breakfast, egg, eggetarian, gluten-free, Protein rich, quick, spinach, अंडी, ग्लुटेन-फ्री, स्पिनच