पालक पुरी
Sujata Hande-Parab
पुरी ही एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. पुरी विविध प्रकारे बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये पुरीला प्रथम स्थान आहे. पुरी- भाजी, पुरी-श्रीखंड असे प्रकार समारंभाला, पूजेला केले जातात. गोलमटोल पुरी आणि श्रीखंड ह्यांचा मेळ तर पांढर्या दगडावरची काळी रेघ आहे. हल्ली पुरी ला वेगवेगळ्या भाज्या वापरुन हेलथी पुरी बनवल्या जातात. जसे की पालक पुरी, बीटरूट पुरी, मेथी पुरी असे अनेक प्रकार सांगता येतील.
Course Breakfast, Main Course, Snack
Cuisine Indian
- गहू पीठ - १ १/२ कप
- पालक - ३/४ कप
- जिरा - १/२ टेबलस्पून (जाडसर वाटून घेतलेला)
- लसूण पेस्ट - १/२ टिस्पून (3-४ पाकळ्या)
- हिरव्या मिरच्या - 2 कापून घेतलेल्या
- जाड दही - १ टेबलस्पून
- स्वादानुसार मीठ
- तेल - १ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + २ कप तळण्यासाठी
- पाणी- १/४ कप किंवा घट्ट पीठ मळण्यासाठी लागेल तसे
पालक पाने धुऊन, गरम पाण्यात टाकून २ मिनिटे ठेवावीत. गॅस बंद करावा. गरम पाणी काढून टाकावेआणि त्यात थंड पाणी ओतावे. पाणी काढून टाकाव. एका ब्लेंडर/मिक्सरमध्ये ही पाने,लसूण, हिरव्या मिरच्या टाकून बारीक वाटून घ्यावीत किंवा प्युरी करावी.
एका परातीत गव्हाचे पीठ, मीठ, तेल, वाटलेले जिरा, दही, आणि पालक-लसूण-हिरव्या मिरचीची प्युरी घ्या. चांगले मिक्स करावे
थोडे थोडे पाणी हळूहळू टाकावे आणि ते कडक किंवा घट्ट मळून घ्यावे.
झाकण ठेवून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावे.
एका कढाईत तेल गरम करावे.
कणिकचे थोडे भाग घ्या आणि गोळे बनवून घ्या.
थोडे तेल पोळपाटाला लावून घ्यावे.
एक गोळा घ्या. सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. पुरी थोडी जाड असावी.
मध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउन होईपर्यंत फ्राय करा.
बटाटाची भाजी किंवा चण्याच्या भाजी किंवा कोणत्याही कडी बरोबर गरम सर्व्ह करा.
- पुरी साठी पीठ घट्ट मळावे.
- पालक ब्लांच करून घ्यावा. जास्त शिजवू नये.
- पुरी लाटताना तेलाचा वापर करावा.
- पुरी तळताना एक किवा दोन पुर्या टाकून तळावे.
Keyword Fried, indian,, kids friendly, leafy vegetable, quick, spinach, Vegetarian, इंडियन, पालक, फ्युजन, फ्राय