नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry
Sujata Hande-Parab
ब्रेड फ्रूटकिंवा नीर फणस हे मुख्यतः गोवा, केरळ आणिकर्नाटकच्या किनारपट्टीवर मिळते. नीर फणस कापा हा गोव्यातील अतिशय लोकप्रिय पदार्थआहे. नीर फणसाची सुककी भाजी ही देखील गणपतीच्या सणांमध्ये मुख्यतः तयार केली जाते.
Prep Time 15 minutes mins
Cook Time 15 minutes mins
20 minutes mins
Total Time 50 minutes mins
Course Side Dish
Cuisine Indian
- १ मोठे नीर फणस - (सोलून, तुकडे करून घेतलेले)
- १/२ -३/४ टेबलस्पून लाल तिखट तिखट कमी आवडत असेल तर प्रमाण थोडे कमी करू शकतो.
- १/२ टेबलस्पून गरम मसाला
- १ टीस्पून हळद पावडर
- चवीनुसार मीठ
- १/२ कप बारीक रवा
- १ १/२ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- ४ ते ५ टेबलस्पून तळण्यासाठी तेल
नीर फणस धुवा. हाताला थोडे तेल लावून नीर फणस सोलून त्याचे चार भाग करावेत. मध्ये असणारा कडक आणिर बरसारखा भाग कापून टाकावा. त्याचे स्लाइस करावे. स्लाइस साधारण १/४ इंच जाड असावा.
काप ही परत धुऊन घ्याआणि कोरडे करा. ते वाडग्यात घ्या. थोडे मीठ घाला. हळद, गरम मसाला, लाल तिखट घाला.सर्व कोरडे मसाला चांगले फोडींना लावून घ्या. २० मिनिटे मॅरीनेट होऊ द्या.
एका प्लेटमध्येरवा आणि तांदळाचे पीठ पसरवा. नीर फणसाचे तुकडे चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूंनी कवर किवा कोट करून घ्या.
हे तुकडे तेल गरम केलेल्या नॉनस्टिक पॅनवर हलक्या हाताने ठेवा आणि एक बाजू तपकिरी होईपर्यंत तळू द्या. ताटाने किवा प्लेट ने त्याला झाकून ठेवले तरी चालेल. साधारणत: एक बाजू भाजायला ५ ते ६ मिनिटे वेळ जातो. भाजने हे तुम्ही केलेल्या कापाच्या साइज वर ही अवलंबून असते. गॅस ची आच कमी ठेवा.
ते उलटे करा आणि दुसऱ्या बाजूने तळा. कापांवर थोडे तेल टाका. २ ते ३ मिनिटे झाकूनठेवा
प्लेट काढा आणि ते कुरकुरीत होईपर्यंत एक मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त तव्यावर राहू द्या.
गरम सर्व्ह करा. हे डाळ-भात बरोबर अतिशय चवदार लागतात.
- हाताला थोडे तेल लावून नीर फणस सोलून म्हणजेच त्याचे वरचे काटेरी आवरण काढून, त्याचे चार तुकडे करावेत. मध्य भाग काढून टाकावा.
- स्लाइस साधारण १/४ इंच जाड असावेत.
- रवा बारीक वापरावा.
- तिखट आवडत असेल तर प्रमाण थोडे वाढवू शकतो.