Go Back

नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा

Sujata Hande-Parab
स्वादिष्ट असा संत्र्याचा शिरा हा संत्र्याचा सालीचा किस वापरून केलेला आहे. दूध ऐवजी नारळ दूध वापरले आहे. माईल्ड नारळाचे दूध आणि संत्रे जेस्ट ह्याचा वापर करून केलेला शिरा अतिशय स्वादिष्ट लागतो. रवा व्यवस्तीत भाजून घ्यावा नाहीतर डिश ची चव बदलून जाईल. 
Prep Time 20 minutes
Cook Time 15 minutes
Total Time 35 minutes
Course Breakfast, Dessert, Snack
Cuisine Indian
Servings 2 People

Ingredients
  

  • ४-५ टेबलस्पून बारीक रवा 
  • टेबलस्पून तूप
  • २-३ टेबलस्पून साखर
  • कोमट नारळ दूध - १ कप शिरा साठी  + १/४ कप केशर मिश्रण तयार करण्यासाठी
  • १/४ टिस्पून वेलची पूड
  • ५-६ लहान मनुका कापून
  • १ १/२ टिस्पून ऑरेंज जेस्ट किंवा बाहेरील आवरण किसून
  • ८-९ केसर स्ट्रेंड्स

Instructions
 

केसर दुधाचे मिश्रण

  • एका लहान वाडग्यात १/४ कप कोमट नारळाचे दूध घ्या. त्यात केसर टाकून चांगले मिक्स करावे. झाकून ठेवावे.

नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा

  • रवा मंद आचेवर लाल रंगावर भाजून घ्यावा. त्याला ७-8 मिनिटे लागतील.
  • तूप घाला. चांगले एकत्र करून घ्या. २ मिनिटे परत भाजून घ्या.
  • वेलची, जायफळ पावडर, साखर, टाकून घ्या. नीट ढवळून घ्यावे
  • १ कप कोमट नारळ दूध आणि केसर दुधाचे मिश्रण घाला. आणि १-२ मिनिट चांगले मिक्स करावे. गॅस फ्लेम बंद करा. झाकण ठेवून५ -७ मिनिटे  तसेच ठेवावे.
  • बारीक चिरलेल्या मनुका आणि संत्र्याचा झेस्ट टाका.  चांगले मिक्स करावे. शिरा तयार आहे.
  • केसरने सजवून आणि गरम सर्व्ह करावे.

Notes

  • रवा  ७ ते ८ मिनीटे मंद आचेवर कोरडा भाजून घ्यावा. 
  • साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावी. 
Keyword Coconut Milk, fusion, healthy, Indian Breakfast, quick, Rava, Samolina, इंडियन, नाश्ता, रवा