Go Back

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

Sujata Hande-Parab
“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे.
दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची लागवड केली जाते. ह्याची कोशिंबीर, भाजी किंवा ईतर विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. अतिशय पोषक अश्या ह्या भाजीत निरोगी फायबर, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, जस्त, थायामिन, लोह, मॅग्नेशियम आणि मँगनीजमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात.
Prep Time 10 minutes
Cook Time 5 minutes
Total Time 15 minutes
Course Condiment
Cuisine Fusion, Indian
Servings 4 people

Equipment

  • १ मिक्सर/ब्लेंडर

Ingredients
  

  • भाजलेले शेंगदाने – १/४ कप
  • ३ (मध्यम तिखट) हिरव्या मिरच्या तिखट आपल्या अवडिनुसार कमी जास्तकरता येते.
  • ३-४ लसूण पाकळ्या –  सोलून घेतलेल्या (छोट्या)
  • १/२ कप दुधी भोपळा साल
  • टेबलस्पून किसलेले ओले खोबरे
  • १/२   टीस्पून भाजलेला जिरा
  • चवीनुसार मीठ
  • कंसिस्टंसीसाठी (घट्ट किवा पातळ बनवन्यासाठी)- आवश्यकते नुसार साधे पाणी.(पर्यायी)

Instructions
 

  • शेंगदाने भाजलेले नसतील तर भाजून घ्या. सोलून घ्या. मी न सोलताच  वापरले आहेत.
  • त्यातच लसूण, दुधी भोपळ्याची साल, लसूण घालून २ ते ३ मिनिटे भाजून घ्या.
  • ओले खोबरे घालून १ मिनिट परतून घ्या.
  • सर्व साहित्य एकत्र करून, मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्या. (एकडम जाड किवा बारीक नाही).
  • कंसिस्टंसी आपल्याला हवी असेल तशी करा. थोडी पातळ हवी असेल तर १ टेबलस्पून पाण्याचा वापर करा. आणि पुन्हा थोडा वेळ मिक्सरला फिरवून घ्या.
  • सर्व्ह करा. किवा हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रिजरमध्ये ठेवा. ६ ते ७ दिवस चांगली राहते.

Notes

  • चांगल्या चविसाठी ताजाच नारळ वापरा.
  • कंसिस्टंसी आपल्याला हवी असेल तशी करा. घट्ट हवी असेल तर थोड्याच पाण्याचा वापर करा. जास्त पाणी घालू नका.
  • चटणी हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रिजर मध्ये ठेवा. ३ ते ४ दिवस चांगली राहते.
Keyword Bottle Gourd, Chutney, quick, चटणी, झटपट, दुधी भोपळा, दुधी भोपळा सालीची चटणी