दक्षिण भारतीय बीटरूट पचडी
Sujata Hande-Parab
“पचडी” ही पारंपारिक दक्षिण भारतीय-केरळ डिश आहे आणि ओणमच्या निमित्ताने तयार केली जाते. हे वाफवलेल्या भाताबरोबर चांगले जाते. “दक्षिण भारतीय बीटरूट पचडी” ही खाण्यास अतिशय आरोग्यदायी आणि पोषक अशी आहे. पचडी ही रायत्याशी थोडी मिळती-जुळती आहे. भाज्या आणि फळांचा वापर पचडी बनवण्यासाठी केला जातो.
Prep Time 15 minutes mins
Cook Time 15 minutes mins
Total Time 30 minutes mins
Course Condiment, Salad
Cuisine Indian
- १ मध्यम किसलेले बीटरूट
- १/२ टीस्पून हळद
- चवीनुसार मीठ
- १ कप शिजवण्यासाठी पाणी
- दही - ४ चमचे + २ चमचे पाणी (फेटून घ्या)
पेस्ट साठी
- १/२ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून जिरे
- ४-५ टेबलस्पून किसलेले नारळ
- ३-४ हिरव्या मिरच्या –तिखट/ मध्यम तिखट
टेम्परिंगसाठी
- १ १/२ टीस्पून तेल
- १/२ टीस्पून मोहरी
- ७-८ कढीपत्ता पाने
- १ लाल मिरची तुकडे करून घेतलेली
किसलेले खोबरे, मोहरी, जिरे आणि हिरवी मिरची एकत्र मिक्स करून बारीक पेस्ट करा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला.
एका पॅनमध्ये पाणी, किसलेले बीटरूट, हळद आणि मीठ घाला. बीटरूट मऊ होईपर्यंत आणि सर्व पाणी सुकेपर्यंत शिजवा.
तयार नारळ-मोहरी पेस्ट घाला. चांगले मिसळा. १ किंवा २ मिनिटे शिजवा.
फेटलेले दही घाला. नीट ढवळून घ्यावे आणि गॅस बंद करा.
टेम्परिंग पॅन किंवा सॉसपॅनमध्ये तेल गरम करा.मोहरी घाला. ते फुटू द्या.
कढीपत्ता आणि तुकडे केलेली लाल मिरची घाला. काही सेकंद ढवळा.
शिजवलेल्या बीटरूटच्या मिश्रणात ही फोडणी घाला. चांगले मिसळा.
गरमा-गरम भाताबरोबर सर्व्ह करा.
Keyword beetroot, curd, pachadi, quick, salad