तमागोयकी (जापनीज ऑम्लेट)
Sujata Hande-Parab
तमागोयकी हा एक प्रकारचा जपानी आमलेट चा प्रकार आहे जो शिजवलेल्या अंड्यांच्या विविध लेएर्स एकत्र आणून त्याचा रोल बनवला जातो आणि कापून सर्व केलाजातो. हे सकाळी न्याहारीसाठी खाल्ले जाते.
Prep Time 5 minutes mins
Cook Time 15 minutes mins
Total Time 20 minutes mins
Course Breakfast
Cuisine Japanese
- ३ अंडी
- १/४ टीस्पून सोया सॉस
- १/४ टीस्पून साखर
- १/२ टीस्पून ग्राउंड किंवा कुटलेली काळी मिरी
- चवीनुसार मीठ
- १/२ टेबलस्पून तेल
एका खोल बाउलमध्ये अंडी, सोया सॉस, कुटलेली काळी मिरी, साखर आणि मीठ घ्या. चांगले फेस येईपर्यंत फेटून घ्या.
नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. तयार अंड्याचा मिश्रणाचा एक पातळ थर घाला. पॅन थोडे हलवून समान रीतीने पसरवा आणि कमी फ्लेम वर काही सेकंद सेट होऊ द्या
लाकडी फोर्क किंवा काटा चमच्यांचा पाठचा भाग वापरून आम्लेट गुंडाळून किवा रोल करून घ्यावे.
पहिल्यांदा दोन्ही बाजूनी दुमडून घ्या. नंतर गोलाकार रोल करून घ्या. मिश्रण तोडे ओले असतानाच हि क्रिया करावी.
हा लॉग पॅन मधेच पण एका टोकापासून दूर ठेवा.
परत अंड्याचे थोडे मिश्रण ओतून घ्या आणि समान पसरवून घ्या.
काही सेकंड सेट झाल्यावर चमच्याने फोल्ड किंवा दुमडून घ्या. आणि जो रोल बनवून ठेवला होता त्याला घेऊनच रोल करून घ्या.
हा एग रोल पूर्ण झाल्यावर एका ताटात कडून घ्या. एक अलुमिनिम फॉईल वापरून तो व्यवस्तीत त्यात दुमडून किंवा रोल करून घ्या.
४-५ मिनिटे बाजूला ठेवा. कापून, गरम सर्व्ह करा.
- कमी आचेवर आमलेट शिजवा ते रोल करण्यास सोपे जाते.
- बारीक चिरलेला कांदा किंवा मिरची देखील टाकू शकता.
Keyword egg, eggetarian, healthy, Protein rich, quick, अंडी