Go Back

ड्रॅगनफ्रूट पॅनकेक

Sujata Hande-Parab
अतिशय चविष्ट आणि पटकन होणारी हि “ड्रॅगनफ्रूटपॅनकेक” रेसिपी मीड्रॅगनफ्रूट रस आणि मैदा वापरून केली आहे.  त्याला फुलवण्यासाठी मी बेकिंग पावडर आणि सोडा चा वापर केला आहे. फ्लेवर साठी ड्रॅगनफ्रूट रस वापरला आहे. 
ड्रॅगनफ्रूट हे एक अतिशयपोषक असे फळ आहे. त्याला स्वता:ची अशी चव नसते. हे फळ मुख्यतः अमेरिका, मेक्सिको, आणि युरोपीयदेशांमध्ये घेतले जाते. ह्या फळांमध्ये विटामीन सी, बी, ई, पोटॅशियम, फाईबर असेविविध घटक असतात.
Prep Time 10 minutes
Cook Time 12 minutes
Total Time 22 minutes
Course Breakfast
Cuisine Continental
Servings 4 people

Equipment

  • १ नॉनस्टिक पॅन

Ingredients
  

  • २-३ टेबलस्पून तेल तळण्यासाठी
  • 3 - ४ टेबलस्पून पीठी साखर आपल्या चवीनुसार कमी जास्त करा
  • 3/4 कप ड्रॅगनफ्रूट पल्प किंवा घट्ट रस
  • १ १/४ कप  दूध आणखीन लागत असेल तर साधे दूध वापरावे.
  • १/४ कप कॉर्नफ्लोर (सफेद)
  • कप मैदा
  • १/२ टीस्पून बेकिंग पावडर
  • १/२ टीस्पून बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा

सजावटीसाठीआणि सर्व्ह करण्यासाठी

  • २-३ टेबलस्पून मध
  • टेबलस्पून चेरीस
  • १/२ टेबलस्पून बारीक कापलेली काजू
  • १/४ कप बारीक तुकडे केलेला ड्रॅगनफ्रूट

Instructions
 

  • एका वाडग्यात मैदा, पीठी साखर, कॉर्न फ्लोर, खाण्याचा सोडा आणि बेकिंग पूड घालून घ्या.  
  • त्यात ड्रॅगनफ्रूट रस आणि दूध घालून हळू हळू ढवळून घ्या.  मिश्रण जास्त पातळ करू नये.
  • एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात एक वाटी चमचा ड्रॅगनफ्रूट पीठ मिश्रण गोलाकार घाला.
  • गॅसची आच पीठ टाकताना मध्यम जास्त असू द्या. नंतर लगेचच तो मंद मध्यम ठेवा. नाही तर पॅनकेक करपतील.
  • काही सेकंदांनी थोडे थोडे बुडबुडे पॅनकेक वर येतील आणि त्याच्या बाजू सुटू लागतील.
  • दुसरी बाजू १ मिनिटे भाजून घ्या. पॅनकेक काढून प्लेट वर ठेवा.
  • असा प्रकारे सगळे पॅनकेक करून घ्या.
  • सर्व्ह करताना वरून  ड्रॅगनफ्रूट, केळ्याचे पातळ काप,डाळिंबाचे दाणे, मध आणि चेरीस घालून सर्व्ह करा किंवा टिफिन मध्ये घालून द्या

Notes

  • मधा ऐवजी मॅपल सिरपचा वापर आणि विविध फळाबरोबर हे सर्व्ह करू शकता.
  • मिश्रण जास्त घट्ट असल्यास समान तापमानावर(साधे दूध) असलेले दूध वापरू शकता
Keyword breakfast, dragon fruit, pancake, quick, ड्रॅगनफ्रूट, पॅनकेक